New year, नाताळसाठी मध्य रेल्वे सोडणार ७६ विशेष गाड्या
मुंबई :
नाताळ, नववर्ष तसेच हिवाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त ७६ हिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या मुंबई-करमळी, नागपूर- मंगळुरू- तिरुवनंतपुरम तसेच पुणे-नागपूर-अमरावती-सांगानेर दरम्यान चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण सुरु झाले असल्याची मागणी मध्य रेल्वेने दिली.
विशेष गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-करमळी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष गाडीच्या एकूण ३६ सेवा चालविण्यात येणार आहेत. गाडी क्र. ०११५१ ही दैनिक विशेष गाडी १९ डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०११५२ करमळी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष गाडी १९ डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज करमळी येथून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ३. ४५ वाजता पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीच्या ८ सेवा चालविण्यात येणार आहेत. ०११७१ ही साप्ताहिक विशेष गाडी १८ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम उत्तर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल.
गाडी क्र.०११७२ तिरुवनंतपुरम उत्तर– लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर २०२५ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत प्रत्येक शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गाडी तिसऱ्या दिवशी रात्री १ वाजता पोहोचेल. या गाडीच्या ४ सेवा चालविण्यात येतील.
०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस -मंगळुरू जंक्शन-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीच्या ८ सेवा चालविण्यात येणार आहेत. ही साप्ताहिक विशेष गाडी १६ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रत्येक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी ४ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या ४ सेवा चालतील.
New year मंगळुरूसाठी विशेष गाडी
०११८६ मंगळुरू जंक्शन-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी १७ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रत्येक बुधवारी मंगळुरू जंक्शन येथून दुपारी १ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता पोहोचेल. या गाडीच्या ४ सेवा चालतील. गाडी क्र. ०१००५ च्या २० डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेषच्या ६ सेवा चालतील. तर गाडी क्र.०१००६ नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून सुटेल या गाडीच्या ३ सेवा चालविण्यात येतील.
हेही वाचा : New Year : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स्, बारची होणार तपासणी
०१४०१ या पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या ६ सेवा १९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत दर शुक्रवारी गाडी चालविण्यात येईल. ०१४०२ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत दर शनिवारी नागपूर येथून सुटेल. तर पुणे-सांगानेर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या ६ सेवा चालविण्यात येतील. ०१४०५ पुणे–सांगानेर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक ०१४०५ ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी १९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत चालविण्यात येईल. गाडी क्रमांक ०१४०६ ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी २०२६ या कालावधीत दर शनिवारी सांगानेर स्थानकातून ११.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. पुणे-अमरावती-पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या ६ सेवा चालविण्यात येतील.



