बहुराष्ट्रीय कंपनीकडून ITI मध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण 

सर्वतोपरी सहकार्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन  

मुंबई : 

अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय जबील कंपनीने महाराष्ट्रातील काही निवडक आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जबील कंपनीच्या शिष्टमंडळाने बुधवारी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेतली. यावेळी कंपनीने महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.

निवडक ITI मध्ये इलेक्ट्रॉनिक्ससाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारणार

तरुणांना रोजगाराभिमुख आणि स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभाग विविध उपक्रम राबवत असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे. याच अनुषंगाने जगभरातील नवे नवे तंत्रज्ञान आयटीआयच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न असल्याचेही मंत्री लोढा म्हणाले. जबील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला तसेच कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख गुंडूराव पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेत निवडक आयटीआय संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणे, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रासाठी Industry Ready संकल्पनेनुसार कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच समकक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा : केळेवाडी bridge होणारच; सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही – मंगल प्रभात लोढा

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जबील कंपनीला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच राज्यभरात व्यापक प्रमाणावर रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी अन्य कंपन्यांचा ही सहभाग वाढवण्यासाठी विभाग प्रयत्न करेल असेही मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण मिळणार असून त्याचा भविष्यात मोठा लाभ होणार आहे. या बैठकीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांनी आयटीआय मध्ये सध्या सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहितीही जबील कंपनीच्या शिष्टमंडळाला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *