one-act play : उंबरठा एकांकिका स्पर्धेत ‘थिम्मक्का’ सर्वोत्कृष्ट
मुंबई (उमेश मोहिते) :
उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने आयोजित “उंबरठा” या राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार दिनांक १३/१२/२०२५ रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडली. या स्पर्धेत ‘थिमक्का’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. २५ हजार रोख रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता साहिल कदम व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अपर्णा घोगरे ठरली.
ना. म. जोशी मार्ग येथील उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी ‘उंबरठा’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धेचे २२ वे वर्ष होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी ७ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रंगली. त्यात ३० संघांनी एकांकिकेचे सादरीकरण केले.
अंतिम फेरीमध्ये सहभागी संघ
१) स्वातंत्र्य सौभाग्य (मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, ठाणे), २) रेशनकार्ड (अमर हिंद मंडळ, दादर), ३) स्पर्शाची गोष्ट (नक्षत्र कला मंच मुंबई), ४) शपथ घेतो की (नाट्यरॠणी आणि विवेक वाणिज्य महाविद्यालय), ५) एका लेखकाची अर्धवट राहिलेली गोष्ट (रंगोदय रूपांतर, मुंबई), ६) थिम्मक्का (सतीष प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे)
आम्ही उंबरठ्याचे मानकरी : ‘थिम्मक्का’ (सतिश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय), ‘एकांकिका द्वितीय : स्वातंत्र्य सौभाग्य, मुलुंड वाणिज्य महाविद्यालय सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – स्पर्शाची गोष्ट, नक्षत्र कला मंच, मुंबई,
एकांकिकांमध्ये चुरस रंगली. या स्पर्धेचे परीक्षण दीपक राजाध्यक्ष, राहूल वैद्य, शिरिष लाटकर यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे अंकित काणे, संपादक सकाळ माध्यम समूह (महाराष्ट्र -दिल्ली), त्रैलोक्य प्रॅाडक्शन च्या माध्यमातून आचार्य अत्रे लिखित ‘भ्रमाचा भोपळा’ या व्यावसायिक नाटकाची निर्मिती. तसेच उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष दीपक निकम, कला विभागप्रमुख आदित्य कदम आदी उपस्थित होते.
विजेते सर्वोत्कृष्ट one-act play द्वितीय
स्वातंत्र्य सौभाग्य, मुलुंड वाणिज्य महाविद्यालय सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – स्पर्शाची गोष्ट, नक्षत्र कला मंच, मुंबई, लक्षवेधी अभिनेत्री : अपर्णा घोगरे (स्पर्शाची गोष्ट), लक्षवेधी अभिनेता : साकार देसाई, (स्पर्शाची गोष्ट), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: साईराज घोलप (थिम्मक्का) सर्वोत्कृष्ट लेखक : सिद्धेश साळवी (स्वातंत्र्य सौभाग्य), सर्वोत्कृष्ट नेपथ्य : अद्वैत साप्ते (स्वातंत्र्य सौभाग्य), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : सिद्धेश नांदलस्कर (थिम्मक्का), सर्वोत्कृष्ट रंगभूषा : (थिम्मक्का), सर्वोत्कृष्ट वेशभूषा : समृद्धी करंगुटकर (स्वातंत्र्य सौभाग्य), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : श्रषभ करंगुटकर, प्रणव चांदोरकर (स्वातंत्र्य सौभाग्य).
हेही वाचा : Election : उबाठा मनसेचे मराठी विभागांवर लक्ष्य
मंडळाचे सदस्य व माजी अध्यक्ष जेष्ठ रंगकर्मी, उत्कृष्ट दिग्दर्शक व कलाकार कै. रघुनाथ भास्कर कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान या वर्षापासून सुरू करण्यात आला व त्या सन्मानाचे मानकरी विशाल शशिकांत कदम ठरले.