Central Railwayच्या मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकावरील थांबा रद्द

मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक

मुंबई :

अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार ११ जानेवारी रोजी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

मुंबईमध्ये रविवारी मेगाब्लॉक – voice of eastern
मुंबईमध्ये रविवारी megaablock

मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील व पुढे पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर स्थानक येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द

ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे – वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी, नेरूळ,पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील गाड्या रद्द राहतील. तसेच पनवेल, नेरूळ,वाशी स्थानकांवरून ठाणेकडे सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या रद्द राहतील. ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

हेही वाचा : एमएचटी CET व एमबीए, एमएमएस प्रवेश नोंदणी १० जानेवारीपासून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *