CSMT रेल्वे स्थानकात होता येणार ‘रिलॅक्स’

संपूर्ण शरीरासाठी मसाज खुर्च्या उपलब्ध : ९९ रुपयांपासून सेवा सुरु

मुंबई :

प्रत्येक मुंबईकर जगात असलेल्या धावपळीच्या जगामध्ये त्याला काही काळ व्हावे असे वाटत असते. मात्र असे क्षण त्याच्या आयुष्यात फारच कमी येत असतात. मात्र आता कामावर जाणाऱ्या प्रत्येक मुंबईतील नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज स्थानकांमध्ये (CSMT) रिलॅक्स होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी नागरिकांना फक्त ९९ रुपये मोजावे लागणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उभारण्यात आलेले रिलॅक्स झोन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उभारण्यात आलेले रिलॅक्स झोन

प्रवासी भाडे व्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणाऱ्या मध्य रेल्वेने आणखी एक महत्वाचा उपक्रम सुरु केला आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात ‘रिलॅक्स झोन’ची (Relax Zone) सुरूवात केली आहे. या झोन मध्ये संपूर्ण शरीरासाठी मसाज खुर्च्या उपलब्ध असून प्रवाशांना ९९ रुपयांपासून सेवा मिळणार आहेत.

स्थानकावरील सुविधा वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मध्य रेल्वेने उचलले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे अत्याधुनिक ‘रिलॅक्स झोन’ (Relax Zone) सुरू केले आहे. क्विक रेस्टद्वारे व्यवस्थापित ही नवी सुविधा थकलेल्या प्रवाशांना सुखद अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यात संपूर्ण शरीरासाठी मसाज खुर्च्या उपलब्ध आहेत. ज्या प्रवाशांना थकवा, स्नायूंचा ताण आणि तणाव अशा समस्या आहेत, त्यांना याचा उपयोग होणार आहे.

CSMT स्थानकात प्रवासाआधी किंवा नंतर करता येणार आराम

या रिलॅक्स झोनमध्ये (Relax Zone) अत्याधुनिक मसाज तंत्रज्ञान तसेच स्वच्छतायुक्त आसन व्यवस्था असून, त्यामुळे सेवा घेणाऱ्या प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित अनुभव मिळतो. ही सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध असून केवळ ९९ रुपयांपासून ही सेवा प्रवाशांना मिळणार आहे. प्रवाशांना प्रवासाआधी किंवा प्रवासानंतर आराम मिळविण्याचा हा एक पर्याय ठरणार आहे. संपूर्ण शरीरासाठी मसाज खुर्च्या उपलब्ध आहेत. ज्या प्रवाशांना थकवा, स्नायूंचा ताण आणि तणाव अशा समस्या आहेत, त्यांना याचा उपयोग होणार आहे.

प्रवासी भाडे व्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणाऱ्या मध्य रेल्वेने आणखी एक महत्वाचा उपक्रम सुरु केला आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात ‘रिलॅक्स झोन’ची सुरूवात केली आहे.

हेही वाचा : मुंबईचा कायापालट : देवेंद्र फडणवीस यांचा Mumbai साठी ‘मास्टर प्लॅन’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *