कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, BJP चे पाचही उमेदवार विजयी

मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई :

राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या मलबार हिल विधानसभेत येणाऱ्या पाचच्या पाच वॉर्डमध्ये कमळ फुलवण्यात मंत्री लोढा यशस्वी झाले असून कार्यकर्त्यांनी मतदार संघातल्या विविध भागात जल्लोष केला. आतापर्यंत जनतेच्या केलेल्या सेवेचीच ही पावती असल्याची प्रतिक्रिया मंत्री लोढा यांनी दिली आहे.

मलबार हिल विधानसभेच्या वॉर्ड क्र. 214 मधून भाजपचे अजय पाटील यांनी मनसेच्या मुकेश भालेराव यांचा तब्बल 8371 मतांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक 215 मधून भाजपाचे संतोष ढाले यांनी उबाठाचे किरण बाळसराफ यांचा 2811 मतांनी पराभव केला. ताडदेव परिसरातील वॉर्ड क्रमांक 217 मधून भाजपाचे उमेदवार गौरांग झवेरी यांनी मनसेचे उमेदवार निलेश शिरधनकर यांच्यावर 8857 मतांनी दणदणीत विजय मिळवला. गिरगाव परिसरातील वॉर्ड क्रमांक 218 मधील भाजपच्या उमेदवार स्नेहल तेंडुलकर यांनी उबाठाच्या गीता अहिरेकर यांचा 7849 मतांनी पराभव केला. तर महालक्ष्मी परिसरातील वॉर्ड क्रमांक 219 चे भाजप उमेदवार सन्नी सानप यांनी उबाठाचे राजेंद्र गायकवाड यांना 7500 पेक्षा जास्त मतांनी धूळ चारली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनप्रमाणे bjp करणार मुंबईचा विकास

विजयाचा आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले की, मुंबई मध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या आणि महायुतीच्या विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात धावणाऱ्या विकासाच्या वेगवान डबल इंजिनला आता तिसऱ्या इंजिनची साथ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनप्रमाणे आता मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.

महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य केले जाईल हा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे. विरोधकांनी कितीही फेक नॅरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला असला तरी, जनतेने विकासालाच कौल दिल्याचा टोला ही त्यांनी विरोधकांना लगावला.

हेही वाचा : BMC election : भयमुक्त मुंबई – भाजपचा नवा अध्याय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *