मुंबईत राज्य अजिंक्यपद Kho-Kho स्पर्धेची धडाकेबाज पर्वणी

२५ ते २८ डिसेंबरदरम्यान राज्य अजिंक्यपद स्पर्धा; राष्ट्रीय संघ निवडीसाठी खेळाडूंमध्ये उत्सुकता - डॉ. चंद्रजित जाधव

मुंबई : 

महाराष्ट्रातील उदयोन्मुख खो-खो प्रतिभांना राष्ट्रीय मंचाची वाट खुली करणारी ३९ वी राज्य किशोर-किशोरी अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा यंदा मुंबईत रंगणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, तसेच मुंबई खो-खो संघटना आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ही महत्त्वपूर्ण स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, सहकारनगर, वडाळा येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली.

मुंबईमध्ये होणार खो खो स्पर्धा – voice of eastern
मुंबईत किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा

श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर व मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख म्हणाले की, “श्री समर्थ व्यायाम मंदिरच्या शतकोत्तर वाटचालीत हा क्रीडोत्सव आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. नुकत्याच पूर्ण झालेल्या १०० वर्षांच्या वारशाला सन्मान देत युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, स्पर्धात्मकता आणि भारतीय खेळांची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवडणार kho-kho संघ

या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून हरियाना येथे होणाऱ्या ३५ व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार असल्याने राज्यभरातील जिल्ह्यांतून तरुण खेळाडूंच्या तयारीला चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. १४ वर्षाखालील (५ फेब्रुवारी २०१२ किंवा त्यानंतर जन्मलेले) खेळाडूंची पात्रता निश्चित करण्यात आली असून, सहभागाची नोंदणी २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ई-मेलद्वारे करावी लागणार आहे. खेळाडूंची २४ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थिती अनिवार्य असेल. फक्त असोसिएशनशी संलग्न जिल्याचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. मुंबईत होणारी ही स्पर्धा राज्यातील तरुण खो-खोपटूंसाठी सुवर्णसंधी ठरणार असून, “राष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी ही स्पर्धा निर्णायक पाऊल ठरेल,” असे डॉ. जाधव म्हणाले.

हेही वाचा : मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर golf courseसाठी अभ्यास करण्यास बीएमसीची परवानगी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *