एमएचटी CET व एमबीए, एमएमएस प्रवेश नोंदणी १० जानेवारीपासून

मुंबई :

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग ( इंटिग्रेटेड) व कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी समूह) व मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए / एमएमएस) या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस १० जानेवारी २०२६ पासून सुरुवात होत आहे. तर १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.

engineering
engineering

राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या (मेन) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही मिळाव्यात म्हणून यावर्षापासून सीईटी कक्षाने या वर्षापासून एमएचटी सीईटी (पीसीएम समूह), एमएचटी सीईटी (पीसीबी समूह) व एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करताना आताच दोन प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत की एक प्रवेश परीक्षा द्यायची हे ठरवावे लागेल. नंतर त्याला ही संधी असणार नाही. विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास तर त्याला दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील.

कधी होणार CET प्रवेश परीक्षा

एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी समूह) प्रथम संधीची प्रवेश परीक्षा ११ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे. तर द्वितीय संधीची प्रवेश परीक्षा १० ते १७ मे २०२६ दरम्यान होणार आहे. तर एमबीए/ एमएमएससाठी प्रथम संधीची प्रवेश परीक्षा ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे. तर द्वितीय संधीची प्रवेश परीक्षा ९ मे २०२६ रोजी होणार आहे. सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील.

२०२५ च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) या प्रवेश परीक्षेमध्ये ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी, एमएचटी सीईटी (पीसीबी समूह) या प्रवेश परीक्षेमध्ये ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांनी तर एमबीए / एमएमएस सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १ लाख १६ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

हेही वाचा : HSC Exam : इयत्ता बारावी परीक्षेची प्रवेशपत्रे सोमवारपासून मिळणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *