Belasis Bridge ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद

मुंबई : 

दक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचे नामकरण बदलून त्याला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाबद्दल कॅबिनेट मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे आभार मानले आहेत. पुलाच्या नामांतरासाठी लोढा यांनी सातत्याने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केला होता.

मंगलप्रभात लोढा
मंगलप्रभात लोढा

ब्रिटिशकालीन अधिकारी मेजर जनरल जॉन बेलासिस यांच्या नावावरून ओळखला जाणारा हा पूल आता मराठा साम्राज्यातील पराक्रमी आणि लोकाभिमुख राज्यकर्त्या Ahilyabai Holkar यांच्या नावाने ओळखला जाणार आहे. वसाहतकालीन स्मृती पुसून भारतीय इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना सन्मान देण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मोडकळीस आलेल्या पुलाची पुनर्बांधणी पूर्ण झाली असून गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे.

Belasis पुलाच्या नामांतराचा निर्णय महत्त्वाचा

या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री लोढा यांनी सांगितले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली देशात वसाहतकालीन वारशाच्या खुणा दूर करून भारतीय अस्मितेला अधोरेखित करणारे अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्याच धर्तीवर मुंबईतील पुलाच्या नामांतराचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोढा यांनी यावेळी मागील वर्षी जुलैमध्ये मुंबईतील कॉर्नॅक पुलाचे ‘सिंदूर ब्रिज’ असे नामकरण करण्यात आल्याची आठवण करून दिली. तसेच कौशल्य विकास विभागाने राज्यातील सर्व आयटीआय संस्थांना संत व महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा : MCA CET : अर्जात २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन दुरुस्तीची संधी

या नामांतरामुळे दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणाला नवी ओळख मिळणार असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *