मुंबईमध्ये तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी Block
हार्बरच्या प्रवाशांना दिलासा
मुंबई :
रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर्स आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर पनवेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकादरम्यान ब्लॉक नसल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना या रविवारी मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबणार असून या लोकल १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. तसेच ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.
ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबतील. माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डीएन ट्रान्स-हार्बर मार्गाच्या सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठीच्या डीएन मार्गाच्या सेवा आणि पनवेल/नेरुळ/वाशीसाठीच्या १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत ठाण्याहून येणाऱ्या अप मार्गाच्या सेवा रद्द राहतील.
बोरीवली आणि गोरेगाव स्थानकादरम्यान Block
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत, सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या गोरेगाव आणि बोरीवली स्थानकांदरम्यान जलद मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहतील आणि अंधेरी आणि बोरीवलीच्या काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत धावतील. ब्लॉक कालावधीत बोरीवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही गाड्या सोडल्या जाणार नाहीत.



