Dental अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण; एकच जागा रिक्त

मुंबई :

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) पाठोपाठ दंत पदवी अभ्यासक्रमाची (बीडीएस) प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेनंतर राज्यभरातील २ हजार ७१८ पैकी २ हजरी ७१७ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. राज्यभरातून बीडीएसची एकच जागा शिल्लक राहिली आहे. विशेष म्हणजे बीडीएससाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये असलेल्या सर्वच्या सर्व ३१८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. रिक्त जागेसाठी प्रवेश फेरी घ्यायची का, याबाबतचा निर्णय उच्च स्तरावर घेतला जाईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) स्पष्ट केले.

यंदा दंत विषयाच्या (बीडीएस) पदवी अभ्यास क्रमासाठी राज्यभरात २ हजार ७१८ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ३१८ जागा सरकारी दंत महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होत्या, तर खासगी महाविद्यालयातील २ हजार ४०० जागांवर प्रवेश प्रक्रिया झाली. पहिल्या फेरीत सरकारी महाविद्यालयातील ३१८ पैकी ३११ जागा विद्यार्थ्यांना अलॉट झाल्या होत्या. त्यापैकी १७१ जागांवर प्रवेश झाले होते. तर खासगी महाविद्यालयातील २ हजार ४०० पैकी २ हजार ३९८ जागा अलॉट होऊन फक्त ७९० जागांवर प्रवेश झाले.

तिसऱ्या फेरीनंतर फक्त एक जागा रिक्त

तिसऱ्या फेरीनंतर हे चित्र बऱ्यापैकी बदलले आणि चौथ्या फेरीसाठी ५०८ रिक्त जागा उपलब्ध होत्या. यापैकी २६ जागा सरकारी महाविद्यालयांतील असून ४८२ जागा खासगी महाविद्यालयांत होत्या. या जागांसाठी चौथी आणि त्यानंतर तीन स्ट्रे फेऱ्या पार पडल्या. या सर्व फेऱ्या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. या फेऱ्यांनंतर तिसऱ्या फेरीनंतर शिल्लक असलेल्या ५०८ पैकी फक्त एकच जागा रिक्त राहिली आहे.

Dental अभ्यासकमांच्या एका जागेसाठी लवकरच निर्णय

राज्यभरात २ हजार ७१८ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ३१८ जागा सरकारी दंत महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होत्या, तर खासगी महाविद्यालयातील २ हजार ४०० जागांवर प्रवेश प्रक्रिया झाली. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता बीडीएससाठीच्या २ हजार ७१८ जागांपैकी २ हजार ७१७ जागांवरील प्रवेश पूर्ण झाले आहेत. यात सरकारी महाविद्यालयांमधील ३१८ आणि खासगी महाविद्यालयांमधील २ हजार ३९९ जागांचा समावेश आहे. शासकीय महाविद्यालयांमध्ये असलेल्या सर्वच्या सर्व ३१८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. रिक्त जागेसाठी प्रवेश फेरी घ्यायची का, याबाबतचा निर्णय उच्च स्तरावर घेतला जाईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) स्पष्ट केले.

हेही वाचा :  ‘मास्टर Stroke’ उपचारामुळे जीव वाचला; अपंगत्वाचा धोका टळला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *