MMC Election : २३ जानेवारीपर्यंत नोंदणी अद्ययावत करा

मुंबई :

न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (एमएमसी) निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी बनविण्यापूर्वी राज्यातील महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना आपली माहिती तातडीने अद्ययावत करण्याचे तसेच नव्याने नोंदणी करावयची असलेल्या डॉक्टरांना तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने केले आहे.

एमएमसीची निवडणूक दर पाच वर्षांनी होणे अपेक्षित असते. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून ही निवडणूक न झाल्याने शासनाने या ठिकाणी प्रशासक बसविला आहे. काही महिन्यापूर्वी ही निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला डॉक्टरांच्या काही संघटनांनी न्यायालयात आवाहन दिले होते. या प्रकरणी न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया स्थगिती केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी न्यायालयाने पुढील तीन महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश एमसीसीला दिले होते. त्यानुसार एमसीसीने आता निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार एमसीसीने राज्यातील सर्व पात्र डॉक्टरांना आपली नोंदणी अद्ययावत करण्याच्या निर्देश दिले आहेत. ज्या डॉक्टरांनी अद्यापपर्यंत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ नोंदणीसाठी अर्ज करावा. ज्या डॉक्टरांचे नोंदणी नूतनीकरण प्रलंबित आहे, त्यांनी विलंब न करता नूतनीकरण अर्ज सादर करावा. याशिवाय नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलांमध्ये बदल अथवा दुरुस्ती आवश्यक असलेल्या डॉक्टरांनी संबंधित कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे आवाहन एमसीसीकडून जारी करण्यात आलेल्या पत्राद्वारे केले आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे डॉक्टरांनी अर्ज भरावेत. विहित शुल्क अदा करावे आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती २३ जानेवारी २०२६ पूर्वी परिषद कार्यालयात पोहोचवाव्यात. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित डॉक्टरांचे नाव एमएमसी नोंदणीत तसेच आगामी निवडणुकीच्या मतदार यादीत समाविष्ट होण्यास अडथळा येऊ शकतो, असेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सुमारे १ लाखांपेक्षा अधिक डॉक्टर सदस्य

राज्यात सुमारे १ लाख ३० हजार डॉक्टर परिषदेचे सदस्य आहेत. या निवडणुकीत ९ जागांसाठी अनेक डॉक्टर निवडणुकीच्या रिंगणात उभे असतात. त्यांना सदस्य असलेले डॉक्टर मतदान करत असतात. काही वर्षांपासून विविध राजकीय पक्षांनीही या गट-तट यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.

MMCचे अधिकार काय ?

एमबीबीएस डॉक्टरांची नोंदणी परिषदेकडे केली जाते. नोंदणीकृत डॉक्टरांनी चुका केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार परिषदेकडे असतात. वैद्यकीय परिषदांना ‘क्रेडिट अवर्स’ याचे काम परिषदेकडे असते. डॉक्टरांच्या परवाना नुतनीकरणाचे कामही परिषदेमार्फत केले जाते.

हेही वाचा : Dental अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण; एकच जागा रिक्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *