Ssc Hall ticket : २० जानेवारीपासून ऑनलाईन मिळणार

मुंबई :

फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) २० जानेवारी २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांनी ही प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in, http://www.mahahsscboard.in वरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करावीत, असे निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

SSC and HSC board
SSC and HSC board

फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मंगळवापासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यानुसार इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे संबंधित माध्यमिक शाळांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत. प्रवेशपत्र छापताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये. छापील प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित शाळांनी आपल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच प्रवेशपत्र उलपब्ध होणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप शुल्क भरलेले नाही, अशा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यानंतर प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे.

फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळांनी सर्व सूचनांची नोंद घेऊन त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

Ssc प्रवेश पत्रामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध

डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रात नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा जन्मठिकाणात दुरुस्ती आवश्यक असल्यास, ती दुरुस्ती ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. यासाठी अर्ज दुरुस्ती ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विहित दुरुस्ती शुल्क भरून प्रस्ताव विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवावा लागेल. मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर सुधारित प्रवेशपत्रे मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.

फोटो व गहाळ प्रवेशपत्राबाबत तरतूद

प्रवेशपत्रावर छायाचित्र सदोष असल्यास, विद्यार्थ्याचा योग्य फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास, संबंधित शाळेने पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Dental अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण; एकच जागा रिक्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *