Health department : बदल्या, बढत्या मूल्यांकन प्रणालीनुसार कामगिरीवर करा

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना

मुंबई :

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, बढती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रा’च्या (एसएचएसआरसी) प्रणालीने केलेल्या कामगिरीच्या मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत झालेली बैठक
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत झालेली बैठक

केंद्र सरकारची ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’’ ही संस्था देश पातळीवर आरोग्य विभागास तांत्रिक सहकार्य करते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र ही संस्था कार्यरत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाची गुणवत्ता वाढ, आरोग्यविषयक संशोधन व तांत्रिक सहकार्य या संस्थेच्या वतीने देण्यात येते. आरोग्य विभागामार्फत एसएचएसआरसी संस्था राज्यातील सर्व जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन करते. तसेच त्यांचे कामगिरीवर आधारित गुणवतेनुसार दरमहा (रँकिंग) गुणानुक्रम (रँकिंग) देत असते. या गुणानुक्रम प्रणालीमध्ये प्रशासकीय, तांत्रिक व वित्तीय बाबींचा समावेश असतो. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदली, बढती करताना, कामगिरीवर आधारित मूल्यांकन (रँकिंग) प्रणालीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य सेवेचे कामकाज अधिक पारदर्शक होईल.

आरोग्य ( Health ) विभागाला सीएसआर निधी उपलब्ध

राज्यातील आरोग्य कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध होत असतो. या निधीबरोबरच नागरिकांना आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) निधी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागाने सीएसआर देणाऱ्या संस्थांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत असलेले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा लेखा व्यवस्थापक, एनएचएम सल्लागार व एनएचएम कार्यक्रम अधिकारी यानी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात. भेटीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. असे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले, यावेळी पदभरती, मानव संसाधन सुसूत्रीकरण, अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या संस्थाच्या बाबतचे सादरीकरण केले.

हेही वाचा : Central Railwayच्या मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकावरील थांबा रद्द

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक राजेंद्र भालेराव, सह संचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत, सह संचलिका डॉ. सरिता हजारे, माजी महासंचालक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. मोहन जाधव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *