Transporter strike : स्कूलबस, टॅक्सी, रिक्षा, मालवाहतूक ठप्प

मुंबई :

ई चलनविरोधात राज्यातील वाहतूकदारांनी ५ मार्चपासून बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ऍक्शन कमिटीच्या शिष्टमंडळाची परिवहन आयुक्तांसोबत आज झालेली चर्चा फिस्कटली. त्यामुळे राज्यातील वाहतूकदारांनी बंदची हाक दिली असून उद्यापासून स्कुल बस, टॅक्सी, रिक्षा, मालवाहतूक बंद राहणार राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. ५ मार्च रोजी आझाद मैदानावर दुपारनंतर आंदोलन करण्यात येणार असल्याने सकाळच्या सत्रामध्ये शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बस उपलब्ध होणार आहे. मात्र घरी परतताना त्यांना स्कूल बसशिवायच यावे लागणार आहे. त्यामुळे गुरूवारी विद्यार्थ्यांचे शाळेतून परतताना हाल होणार आहेत.

राज्य सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आणि ई चलनच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ऍक्शन कमिटीने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी ६.४५ मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्र ट्रान्स्पोर्ट असोसिएशनची परिवहन आयुक्तांसोबत बैठक झाली. या बैठकीवर कोणताही तोडगा न निघाल्याने वाहतूक संघटनेने ५ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या बंदमध्ये स्कुल बस, रिक्षा टॅक्सी, मालवाहतूक असे वाहतूकदार सहभागी होणार असल्याने राज्यभरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. तसेच सकाळच्या सत्रामध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बसने सोडण्यात येणार असल्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. मात्र आंदोलन दुपारी सुरू होणार असल्याने दुपारी शाळा सोडल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी स्कूल बस उपलब्ध नसतील, असे स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना स्कूल बस उपलब्ध होणार असली तरी शाळेतून घरी परतण्यासाठी स्कूल बस नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत नेण्यासाठी आणि आणण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने पालकांना कामावर रजा काढावी लागणार असल्याचे चित्र आहे. वाहतूकदारांचा बंद चिघळल्यास पुढील काही दिवस पालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. वाहतूकदारांच्या मागण्या मान्य न झाल्यास ६ मार्चपासून बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी घडणाऱ्या घटनांवर व प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवून राहा, असे आवाहन महाराष्ट्र ट्रान्स्पोर्ट असोसिएशनकडून करण्यात आले आहे.

Transporter strike : आठ हजारांपेक्षा अधिक स्कूल बस सहभागी होणार

राज्यामध्ये जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक स्कूल बस आहेत. या सर्व बसचे मालक व चालक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. सध्या परीक्षेचा कालावधीत असल्याने स्कूल बस मालक संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायी किंवा अन्य खासगी वाहनाने शाळेत जावे लागणार आहे. छोट्या शहरांमधील मुलांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व पर्यायाने परीक्षेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा : आधुनिक Cancer Medicine सामान्यांच्या आवाक्याबाहेर – टाटा रुग्णालय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *