National park : वनराणी मिनी टॉय ट्रेन बंद 

पीयूष गोयल यांनी वनराणी मिनी टॉय ट्रेनमधील तांत्रिक बिघाड तात्काळ दूर करण्याचे दिले निर्देश; सेवा लवकरच पूर्ववत होणार

मुंबई : 

बोरीवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील ‘वनराणी’ टॉय ट्रेनची सेवा तात्पुरती बंद झाल्याची माहिती उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना मिळताच संबंधित अधिकाऱ्यांना ही सेवा तात्काळ पूर्ववत करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

vanranitrain mini train voice of eastern
वनरानी मिनी ट्रेन

काही दिवसांपूर्वी वनराणी टॉय ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. दुरुस्तीसाठी तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित बिघाड लवकरच दूर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच, दुरुस्ती पूर्ण होताच वनराणी मिनी ट्रेन पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.

सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश

स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी पुढे असेही निर्देश दिले की, अशा प्रकारच्या समस्या पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच, भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ प्रतिसाद व सेवा पूर्ववत करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यावी, जेणेकरून पर्यटकांना अखंडपणे टॉय ट्रेनचा आनंद घेता येईल.

National park मधील प्रमुख आकर्षण

वनराणी मिनी टॉय ट्रेन ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक प्रमुख आकर्षण असून, दररोज मोठ्या संख्येने पर्यटक या सेवेचा आनंद घेत असतात. काही दिवसांपूर्वी वनराणी टॉय ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. दुरुस्तीसाठी तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित बिघाड लवकरच दूर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच, दुरुस्ती पूर्ण होताच वनराणी मिनी ट्रेन पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.

हेही वाचा : Marathi movie : ‘गल्ली नं. १३’ चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *