Metro one app : साडे तीन महिन्यात २७ लाख ८२ हजार तिकीट बुकिंग

मुंबई :

एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत मुंबईकरांना एकाच ‘मेट्रो वन’ मोबाईल ऍपवर मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बेस्ट सेवेचे तिकीट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उपलब्ध करून दिले आहे. या ऍपला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. साडे तीन महिन्यात तब्बल २७.८२ लाख तिकिटांचे बुकिंग झाले आहे. तर ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केली आहे.

मुंबई मेट्रो voice of eastern
मुंबई मेट्रो

मुंबईत मेट्रो १, मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि मेट्रो ७ या मेट्रो मार्गिका प्रवाशांच्या सेवेत आहेत. तसेच उपनगरीय रेल्वे, बेस्ट बस मधून प्रवासी दररोज प्रवास करतात. या प्रवाशांना एकाच कार्ड आणि ऍप आधारित तिकिटावर प्रवास करता यावा यासाठी मेट्रो वन ऍप व कार्ड एमएमआरडीएने प्रवाशांच्या सेवेत आणले. विविध सार्वजनिक परिवहन संस्थांमध्ये मेट्रो २अ आणि ७ मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी मेट्रो वन ऍपवरून तिकीट घेतले आहे. या ऍपला गेल्या साडे तीन महिन्यात प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतातील पहिले कॉमन मोबिलिटी अ‍ॅप म्हणजेच ‘मुंबई वन’ हे एमएमआरमधील स्मार्ट, सुलभ आणि सुरळीत एंड-टू-एंड प्रवासासाठी पसंतीचे ठरले आहे. साडे तीन महिन्यात तब्बल २७ लाख ८२ हजार तिकिटे या ऍपच्या माध्यमातून काढण्यात आले आहे. तर ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी या ऍपसाठी नोंदणी केली आहे.

Metro, बेस्ट, रेल्वेच्या प्रवाशांची पसंती

विविध सार्वजनिक परिवहन संस्थांमध्ये मेट्रो २अ आणि ७ मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी मेट्रो वन ऍपवरून तिकीट घेतले आहे. तब्बल ७ लाख ६८ हजार २४८ प्रवाशांनी या ऍपवरून तिकीट घेतले आहे. तर मेट्रो ३ च्या प्रवासासाठी ७ लाख ३९ हजार ९७७, मुंबई १ वरून प्रवास करणाऱ्या ७ लाख २६ हजार ७१४, उपनगरीय रेल्वेच्या ३ लाख ९३ हजार ४६४, नवी मुंबई मेट्रो १च्या प्रवासासाठी ८९ हजार ७४५ प्रवाशांनी तर बेस्टच्या ४८ हजार ३८७ प्रवाशांनी मेट्रो वन ऍप वरून तिकीट घेतले आहे.

हेही वाचा : Mumbai Uiversity : प्राचीन भारतीय विचारसरणीचा करणार अभ्यास

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *