Samruddhi Highway : गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक
३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत १४ टप्प्यात काम
मुंबई :
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर नागपूर व वर्धा जिल्ह्यात ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. हे काम १४ टप्यात प्रस्तावित आहे. या कालावधीत कामाच्या टप्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांच्या कालावधीकरिता बंद ठेवण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुका व वर्धा जिल्ह्यातील सेलू, आर्वी व वर्धा तालुक्यातून जाणाऱ्या कि.मी ०+०००ते कि.मी ८९+४१३ दरम्यान महामार्गावर हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामाच्या टप्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतुक ४५ ते ६० मिनिटांच्या कालावधीकरिता पूर्णत: थांबविण्यात येणार आहे. ३१ जानेवारी रोजी वर्धा जिल्ह्यातील नागपूर वाहिनीवरील साखळी क्रमांक ५८.९ वर वाहतूक दुपारी १२ ते १ वाजता थांबविण्यात येणार आहे. तर वर्धा तालुक्यात साखळी क्रमांक ५९.५ वर दुपारी १२ ते १ या वेळेत ब्लॉक असेल. तसेच साखळी क्रमांक ६५.४ वर दुपारी ३ ते ४ वाजता नागपूर वाहिनीवर ब्लॉक असेल.
१ फेब्रुवारी रोजी साखळी क्रमांक ३१.५ वर सेलू तालुक्यातील नागपूर वाहिनीवर दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत ब्लॉक असेल. तर साखळी क्रमांक ३७.७ च्या मुंबई वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजता ब्लॉक असणार आहे. साखळी क्रमांक ३७.७ च्या नागपूर वाहिनीवर दुपारी ३ ते ४ पर्यंत, साखळी क्रमांक ४५.४ वर मुंबई वाहिनीवर दुपारी १२ ते १ या वेळेत ब्लॉक असेल.
samruddhi वर मुंबई वाहिनीवर ब्लॉक घेतला आहे.
२ फेब्रुवारी रोजी साखळी क्रमांक ८.६ वर हिंगणा तालुक्यातील मुंबई वाहिनीवर दुपारी ३ ते ४ या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे. साखळी क्रमांक ८.६ वर हिंगणा तालुक्यातील नागपूर वाहिनीवर दुपारी १२ ते १ या वेळेत ब्लॉक असेल. तर साखळी क्रमांक ९.५ वर हिंगणा तालुक्यातील मुंबई वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजता, साखळी क्रमांक ९.५ वर हिंगणा तालुक्यातील नागपूर वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजता, साखळी क्रमांक ९.० वर हिंगणा तालुक्यातील मुंबई वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजता, साखळी क्रमांक ९.० वर हिंगणा तालुक्यातील नागपूर वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्याचप्रमाणे ३ फेब्रुवारी रोजी साखळी ८४.४ वर आर्वी तालुक्यातील मुंबई वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजता ब्लॉक असेल.



