एआय हे शिक्षण, Teacher, विद्यार्थ्यांना सक्षम करणारे माध्यम

मुंबईतील शिक्षक मेळाव्यात मान्यवरांचं मत

मुंबई :

कृत्रिम बुद्धिमत्तेची वेगवेगळी साधने येत आहेत तस तशी विविध क्षेत्रातील कर्मचारी, तंत्रज्ञ आणि अधिकारी यांच्यात कुतुहल आणि भिती असे संमिश्र वातावरण आहे. यात भीतीची टक्केवारी अधिक आहे मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शिक्षण, शेती, उद्योग, साहित्य,संगीत, चित्रपट निर्मिती, पत्रकारिता, दळण वळण पासून सर्वच क्षेत्रात बदल घडून येणार आहेत. यात शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या कामात देखील अमुलाग्रह बदल होणार असून हे सर्व बदल सकारात्मक होऊन शिक्षण आणि शिक्षक यांच्यावरील ताण कमी करून विद्यार्थ्याला शिक्षित होण्यासाठी अधिक सक्षम करणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेतील भेदभाव दूर होऊन,शिक्षण व्यवस्था ही समानतेच्या पातळीवर येणार आहेत.

शिक्षकांची कारकुनी कामे, विद्यार्थी ग्रेडिंग, पेपर तयार करणे, पेपर तपासणे, माहिती देणे ही कामे बाद होऊन, विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकास, त्याच्या सवयी, छंद आणि भावनिक समस्या आणि त्याच्यात असलेल्या विविध गुणवत्तेच्या आधारे त्याला मार्गदर्शन करणे अशी भूमिका असणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी एआय ची भीती न बाळगता, त्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, असे मत शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनावणे यांनी मुंबई येथील छबिलदास शाळेत आयोजित शिक्षक मेळाव्यात मांडले. मुंबई अध्यापक संघाच्या वतीने शिक्षक सन्मान आणि वार्षिक स्नेह मिलन सोहळ्यात किरण सोनावणे बोलत होते, मुंबई अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

मुंबई कोकण शिक्षक महासंघाची घोषणा voice of eastern
मुंबई कोकण शिक्षक महासंघाची घोषणा

याप्रसंगी शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉ माधव सूर्यवंशी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे जनरल एज्युकेशन सोसायटी मुंबईचे कार्यवाह विकास पाटील चित्रपट व मालिका कलावंत अश्विन बोरनारे आंतरराष्ट्रीय कला दिग्दर्शक किशोर कदम आदी उपस्थित होते.

विद्यालंकार महाविद्यालयाचे इंजिनिअरिंग विभागाचे भेट अंजुम मुजावर यांनी ए आय बाबत शिक्षकांशी संवाद साधला यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ए आय बाबतीत होत असलेले बदल यावर त्यांनी सादरीकरण केलं

मुंबई कोकण शिक्षक ( Teacher ) महासंघाची घोषणा

अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षक संघटना ही केवळ प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या इतकी सीमित न ठेवता सर्व क्षेत्रातील शिक्षकांचा एक मोठा महासंघ करण्याची महत्वपूर्ण अशी घोषणा केली. या मध्ये आयटीआय, अभियांत्रिक महाविद्यालय, कला विद्यालय, विधी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय यासह सेल्फ फायनान्स शाळा व महाविद्यालये सीबीएसई आयसीएसई आयबी व अन्य आंतरराष्ट्रीय शाळांमधील अध्यापकांसोबतच मुंबई ठाण्यासह एम एम आर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद मधील शिक्षकांचा या महासंघात समावेश असेल अशी घोषणा अनिल बोरनारे यांनी केल्यावर सभागृहातील सर्व शिक्षकांनी याला समर्थन दिलं.

हेही वाचा : मुंबई-कोकणातील शेकडो School बंद होण्याची भीती

या मेळाव्यात शिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षक मिळून २०० जणांचा सन्मान करण्यात आला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील शिक्षकांनी या कार्यक्रमास भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिक्षक मेळावा यशस्वी करण्यासाठी किशोर मराठे योगेश ठाकरे अवधूत चव्हाण अमोल जागले संतोष मेढे अनिल मुंढे संतोष दावत ज्ञानेश्वर खंबायत गोविंदा सोनावणे भगवान सागर नंदा झेंडे दिपक संदानशिव विजय धनावडे नरेंद्र नाईक सचिन पांडे सुभाष अंभोरे राजेश मोरे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *