JEE main : जेईई मुख्य २०२६ सत्र २ परीक्षा २ एप्रिल राेजी
परीक्षा केंद्राच्या शहरांची विद्यार्थ्यांसाठी माहती जाहीर
मुंबई :
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य २०२६ च्या सत्र २ परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही परीक्षा २ ते ८ एप्रिलदरम्यान होणार आहेत. ही परीक्षा देशातील विविध शहरातील परीक्षा केंद्रांसह परदेशातील १५ शहरांमध्येही ही परीक्षा होणार आहे. जेईईसाठी परीक्षा केंद्रांच्या शहराी माहिती विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, शहर विकास नियोजन यासंदर्भातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जेईई मुख्य परीक्षेच्या सत्र २ मधील परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहेत. यामध्ये बी.ई./बी.टेक (पेपर १) परीक्षा २, ४, ५, ६ आणि ८ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. तर बी.आर्क (पेपर २ ए) आणि बी.प्लॅनिंग (पेपर २ बी) तसेच दोन्ही पेपरसाठी परीक्षा ७ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. जेईई मुख्य २०२६ च्या सत्र २ ची परीक्षा भारतातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर तसेच देशाबाहेरील १५ शहरांमध्ये घेण्यात येणार आहे.

दरम्यान, परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती देण्यासाठी ‘एग्झाम सिटी इंटिमेशन स्लिप’ राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी https://jeemain.nta.nic.in/, https://jeemain.nta.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करून ही स्लिप डाउनलोड करून परीक्षेला कोणते केंद्र आले आहे, याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून करण्यात आले आहे. ही स्लिप म्हणजे प्रवेशपत्र नसून, फक्त परीक्षा केंद्र असलेल्या शहराची माहिती देण्यासाठी आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्याची व त्या शहरामध्ये राहण्याची व्यवस्था करणे शक्य होणार आहे. प्रत्यक्ष प्रवेशपत्र हे परीक्षेच्या काही दिवस अगोदर स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असल्याचेही राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडू स्पष्ट करण्यात आले आहे.
JEE च्या तक्रारीच्या निराकरणासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध
विद्यार्थ्यांना स्लिप डाउनलोड करताना काही अडचण आल्यास त्यांनी ०११-४०७५९००० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा jeemain@nta.ac.in, mailto:jeemain@nta.ac.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असेही राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

