तांत्रिक अडचणीमुळे रद्द झालेली बीएड CET ५ एप्रिलला

मुंबई : 

तांत्रिक अडचणीमुळे बीएड अभ्यासक्रमाच्या मागील दोन दिवसांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावरील Cet परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्या विद्यार्थ्यांची Cet ५ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या cet परीक्षेसाठी सुधारित परीक्षा केंद्राची माहिती व परीक्षेची वेळ त्यांच्या नोंदणीकृत ईमेल व मोबाईल फोनवर कळविण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ( cet cell) जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान २९ मार्च रोजी सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रात घेण्यात आलेल्या cet परीक्षा सुरळीत पार पडल्या. दोन्ही सत्रात मिळून ८७.५८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Cet Cell
राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्ष

तांत्रिक कारणास्तव मागील दोन दिवसात नांदेड येथील मराठवाडा ऑनलाईन परीक्षा केंद्र, परभणी तेथील एमजीएम अकॅडेमी व नागपूर येथील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची बीएडची सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली होती. या केंद्रावरील प्रभावित विद्यार्थ्यांसाठी बीएड (जनरल व स्पेशल) व बीएड (इएलसीटी) ही सीईटी परीक्षा ५ एप्रिल २०२६ रोजी घेण्याचा निर्णय सीईटी कक्षाकडून घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी सुधारित परीक्षा केंद्राची माहिती व परीक्षेची वेळ विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ईमेल व मोबाईल फोनवर कळविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी सुधारित प्रवेशपत्र त्याच्या लॉगीन आयडीमधून डाउनलोड करून घ्यावे,असे आवाहन सीईटी कक्षानी केले आहे.

तिसऱ्या दिवशी cet परीक्षा सुरळीत

सलग दोन दिवस काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र तिसऱ्या दिवशी दोन्ही सत्रांमध्ये परीक्षा सुरळीतरित्या पार पडली. दोन्ही सत्रांमध्ये ३२ हजार ४९२ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. दोन्ही सत्रात मिळून ८७.५८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. राज्यातून कोणत्याही परीक्षा केंद्रावर रविवारी अडचण आली नाही.

Cet exam : दोन्ही सत्रात ८७.५८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

बीएडच्या सीईटी परीक्षेला १,१०,०४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ३२ हजार ४९२ विद्यार्थ्यांची परीक्षा रविवारी दोन सत्रात आयोजित केली होती. सकाळच्या सत्रात बीएड (जनरल व स्पेशल) या सीईटी परीक्षेमध्ये २२ हजार ४३१ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ७४५ विद्यार्थी उपस्थित होते. तर २ हजार ६८६ विद्यार्थी अनुपस्थित होते. सकाळच्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या या परीक्षेला ८८.०३ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. तसेच दुपारच्या सत्रात दुपारी १.३० ते दुपारी २.३० या वेळेत झालेल्या बीएड (इएलसीटी) या सीईटी परीक्षेमध्ये १० हजार ६१ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ७११ विद्यार्थी उपस्थित होते, तर १३५० विद्यार्थी अनुपस्थित होते. एकूण ८६.५८ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही प्रवेश परीक्षा राज्यातील १६४ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

हेही वाचा : Model School : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेत ४०५ शाळा विकसित करणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *