Schools Start : विदर्भासह राज्यातील शाळा यंदा १५ जूनपासून

मुंबई :

वाढत्या तापमानामुळे विदर्भातील शाळा दरवर्षी ३० जूनपासून सुरू होतात. मात्र यंदा शालेय शिक्षण विभागाने विदर्भासह राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य मंडळाच्या सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. तसेच शाळांना २ मे २०२६ पासून उन्हाळी सुटी जाहीर केली आहे.

राज्यातील शाळा सुरू  voice of eastern
शाळा

दरवर्षी जून महिन्यातील तीव्र उष्णतेचा विचार करून विदर्भातील राज्य मंडळाच्या शाळा साधारणतः ३० जूनपासून सुरू करण्याची पद्धत होती. मात्र यंदा शिक्षण विभागाने हा अपवाद रद्द करत राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू केले असून, विदर्भासह सर्व विभागांतील शाळा १५ जून २०२६ पासूनच सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून पासून होणार आहे. राज्यातील सर्व विभागांतील शाळांनी याच तारखेपासून नियमित अध्यापनास प्रारंभ करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. जूनमधील वाढत्या तापमानाचा विचार करून, शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत केवळ विदर्भातील शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेतच चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा बदल १५ जून ते २७ जून २०२६ या कालावधीत लागू राहील. त्यानंतर ३० जून २०२६ पासून या शाळा नियमित वेळेनुसार सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून २८ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

Schools close : २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर

राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २ मेपासून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे उन्हाळी सुटी लागू होईल. दरम्यान, इतर मंडळांच्या काही शाळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार किंवा शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळा सुरू असल्यास, संबंधित शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सुटी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : Mhada Lottery : मुंबई मंडळातर्फे २६४० सदनिकांची सोडत जाहीर

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत