MHT-CET : दुसऱ्या संधीसाठी १२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई –

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटीच्या पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी एक दिवसाची विशेष मुदतवाढ देण्यात आली होती. या एका दिवसाच्या विशेष मुदतवाढीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. एका दिवसात पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी १२ हजार १५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये पीसीएम समूहासाठीच्या सीईटीसाठी ७ हजार ४३३, तर पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ४ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे प्रत्यक्ष भेट देऊन, ई-मेल आणि दूरध्वनीद्वारे दुसऱ्या संधीसाठी नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. विद्यार्थ्यांची विनंती लक्षात घेऊन सीईटी कक्षाने पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी विशेष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २३ एप्रिल रोजी दिलेल्या मुदतवाढील विद्यार्थ्यांकडून चांगल प्रतिसाद मिळाला. एका दिवसात पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी १२ हजार १५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये पीसीएम समूहासाठीच्या सीईटीसाठी ७ हजार ४३३, तर पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ४ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

यापूर्वी MHT-CET साठी ३७ हजार ९० विद्यार्थ्यांची नोंदणी

यापूर्वी दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी विलंब शुल्कासह १५ व १६ एप्रिल रोजी मुदत देण्यात आली हाेती. या तीन दिवसांच्या मुदतीमध्ये राज्यभरातून ३७ हजार ९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये पीसीएम समूहासाठीच्या सीईटीसाठी २५ हजार ३५५, तर पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ११ हजार ७३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

दुसऱ्या संधीसाठी ४ लाख ३८ हजार ४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी

पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीसाठी सीईटी परीक्षेसाठी आतापर्यंत एकूण ४ लाख ३८ हजार ४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएम समूहासाठी ३ लाख २१ हजार ९०८ तर पीसीबी समूहासाठी १ लाख १६ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा :  देशात प्रथमच होणाऱ्या Digital Game डेव्हलपर स्पर्धेत महाराष्ट्र भरारी घेणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *