SNDTWU : चर्चगेट संकुलामध्ये उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

मुंबई :

दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या जुहू परिसरातील विजेची गरज सौरऊर्जेच्या वापरातून भागवण्यास सुरुवात केल्यावर आता विद्यापीठाचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट संकुलातील तीनही इमारतींसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय एसएनडीटी महिला विद्यापीठाने घेतला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठ - voice of eastern
एसएनडीटी महिला विद्यापीठ

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलात तीन इमारती आहेत. यात प्रशासकीय मुख्य इमारत, लेडी पाटकर सभागृहाची इमारत आणि अ‍ॅनेक्स इमारत अशा तीन इमारती आहेत. या तीन इमारतींपैकी मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी मासिक गरज ५० किलोवॅट वीज, लेडी पाटकर सभागृहाच्या इमारतीसाठी ७० किलोवॅट आणि अ‍ॅनेक्स इमारतीसाठी ६० किलोवॅट अशी १८० किलोवॅट विजेची गरज भासते. या वीज पुरवठ्यावर होणारा खर्च नियंत्रणात आणण्यासाठी आणि भविष्यात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत स्वत:च्या गरजेपुरती वीज उत्पादन करण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाने पाऊले उचलली आहेत. त्यानुसार जुहू येथील संकुलामध्ये सौरऊर्जा प्रकल्प सुरू केल्यानंतर आता चर्चगेट संकुलातही सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प राबवला जात आहे.

SNDTWU : विजेची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प

विद्यापीठातील विजेची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प सेव्हन ग्रील सोलार सिस्टिम या कंपनीतर्फे राबवला जात असून त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आली आहे. याबाबतच्या निविदा मागवून मगच संबंधित कंपनीला हे काम देण्यात आले आहे. यात विद्यापीठाचे अभियंता आशीष कांबळे यांचेही मोलाचे योगदान असल्याची माहिती विद्यापीठाचे साईट अभियंता केशव मस्के यांनी दिली.

हेही वाचा : पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक Kho-Kho स्पर्धेचे’ विजेते

विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या नेतृत्त्वाखाली यापूर्वीच जुहू संकुलात सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. आता चर्चगेट येथेही तीनही इमारतींच्या छतावर सौरपटल लावण्याचे काम पूर्णत्त्वास येत आहे. ७ जुलै रोजी विद्यापीठ १११ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्याआधीच विजेची गरज हरित ऊर्जेतून भागवण्याच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. जूनपासूनच चर्चगेट संकुलातील सर्व उपकरणे सौरऊर्जेवर सुरू होतील, असा विश्वासही मस्के यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *