पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते PM-VBRY च्या २४०० कोटींचे वाटप

मुंबईतील कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) अंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे सुमारे २,४०० कोटींच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करण्यात आले. PM-VBRY अंतर्गत हे प्रोत्साहन वितरण १५ लाखांहून अधिक व्यक्तींसाठी अतिरिक्त रोजगाराला चालना देण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे.

केळेवाडी bridge होणारच; सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही – मंगल प्रभात लोढा
मंगलप्रभात लोढा

देशव्यापी जनजागृती आणि लाभवितरण मोहिमेचा भाग म्हणून देशभरातील २०० ठिकाणी समांतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), प्रादेशिक कार्यालय, मुंबई (दादर) यांच्या वतीने वरळी येथील एचएसएनसी विद्यापीठामध्ये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जनजागृती व लाभार्थी वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना लोढा म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली PM-VBRY योजना ही देशातील रोजगार निर्मितीला नवी दिशा देणारी ठरत आहे. या योजनेमुळे युवकांना औपचारिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, नियोक्त्यांनाही रोजगारनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी अशा योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे.”

PM-VBRY : ३.५ कोटींपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती  करणे

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी रोजगार-संलग्न प्रोत्साहन (Employment Linked Incentive – ELI) योजना असून, औपचारिक रोजगाराला प्रोत्साहन देणे, प्रथमच रोजगार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या युवकांना आधार देणे आणि अतिरिक्त रोजगारनिर्मितीसाठी नियोक्त्यांना प्रोत्साहन देणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे.

९९,४४६ कोटींच्या एकूण तरतुदीसह, PM-VBRY चा उद्देश दोन वर्षांच्या कालावधीत देशभरात ३.५ कोटींपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती सुलभ करणे हा आहे. यापैकी अंदाजे १.९२ कोटी लाभार्थी हे औपचारिक कार्यबलात प्रथमच प्रवेश करणारे असतील, अशी अपेक्षा आहे.

मुंबई विभागामध्येही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, EPFO मुंबई-१ (वांद्रे) विभागाने PM-VBRY च्या भाग-अ अंतर्गत ३९,४३९ लाभार्थ्यांना २५.४४ कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरित केली आहे. तसेच भाग-ब अंतर्गत १,८१५ लाभार्थ्यांना ११०.६१ कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे.

हेही वाचा : Bhima-Koregaon Case : एनआयएकडून मुंबई प्रेस क्लबच्या माजी अध्यक्षांसह तिघांची चौकशी

रोजगारनिर्मिती, कार्यबलाचे औपचारिकीकरण आणि सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार या दिशेने PM-VBRY हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असून, विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी ही योजना प्रभावी योगदान देत आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत