shortage of jobs: महाराष्ट्रात नोकऱ्यांची कमतरता नाही – लोढा

मुंबई :

राज्यात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून, उद्योगांना आवश्यक कौशल्ये आणि उपलब्ध मनुष्यबळ यांच्यातील तफावत हेच सध्या सर्वात मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये आयोजित ‘इंडस्ट्री–इन्स्टिट्यूट फ्युचर समिट (IFS) २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. एमआयटी इंडियातर्फे आयोजित या परिषदेला ५०० हून अधिक उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

केळेवाडी bridge होणारच; सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही – मंगल प्रभात लोढा
मंगलप्रभात लोढा

लोढा म्हणाले, “केवळ पदवी मिळविणे पुरेसे नाही. उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्यांची जोड मिळाल्यासच शिक्षणाचे खरे मूल्य वाढते. राज्य शासन कौशल्य विकासावर भर देत असून, या प्रक्रियेत एमआयटी इंडियासारख्या शैक्षणिक संस्था उद्योग आणि शासन यांच्यात प्रभावी दुवा म्हणून काम करत आहेत. अशा उपक्रमांमुळे रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होण्यास मदत होत आहे.”

यावेळी एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंग व विश्वशांती गुरुकुल वर्ल्ड स्कूलचे समूह संचालक दिग्विजय सुनील कराड यांनी विकसित भारत २०४७चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग, शिक्षण संस्था आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली. भविष्यातील कौशल्यसंपन्न मनुष्यबळ घडविण्यासाठी एमआयटी इंडिया सातत्याने उद्योगांसोबत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

shortage of jobs : कृत्रिम बुद्धिमत्ता, कौशल्य विकास यावर चर्चा

दिवसभर चाललेल्या या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), भविष्यातील रोजगार, कौशल्य विकास, स्टार्टअप्स, गुंतवणूक आणि उद्योग-शिक्षण सहकार्य या विषयांवर विविध तज्ज्ञांची पॅनेल चर्चा, राउंडटेबल बैठक, हॅकेथॉन, इन्व्हेस्टर अरेना आणि सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम पार पडले. उद्घाटन सत्राला ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परिषदेची सांगता ‘मुंबई एचआर लीडरशिप अवॉर्ड्स’ वितरणाने झाली.

हेही वाचा : UGC-NET exam आजपासून ३० जूनपर्यंत

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत