Mumbai University : एमएमएस–एमसीएसाठी अतिरिक्त ऑनलाईन प्रवेश परीक्षा

सीडीओईकडून १६ ऑगस्ट रोजी परीक्षेचे आयोजन

मुंबई : 

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत (सीडीओई) चालविण्यात येत असलेल्या एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) आणि एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केले नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वीची ऑनलाईन प्रवेश परीक्षेला देणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Mumbai University : परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
मुंबई विद्यापीठ

सीडीओईमार्फत घेण्यात आलेल्या एमएमएस व एमसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांना बसता आले नाही, तसेच अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज ही करता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत मुंबई विद्यापीठाने या दोन्ही अभ्यासक्रमाची पुन्हा ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अतिरिक्त ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहेत. ही अतिरिक्त ऑनलाईन परीक्षा १६ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. अतिरिक्त ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.

Mumbai University : यूजीसी आणि एआयसीटीईची मान्यता

एमएमएस आणि एमसीए या दोन्ही अभ्यासक्रमांना यूजीसी आणि एआयसीटीईची मान्यता आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या पात्रता, शूल्क, प्रवेश परीक्षेसंबंधातील अधिक तपशील मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने सीडीओईच्या माध्यमातून एमएमएस या अभ्यासक्रमासाठी परवानगी दिली असून हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयात एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. एमसीए हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे.

हेही वाचा : Drug-Free Mumbai : ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेलचा राज्यभर विस्तार

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत