Jupiter Hospital : बीकेसीमध्ये उभारणार ४०० खाटांचे रुग्णालय

३५४ कोटींच्या भूखंड मंजुरीसह ज्युपिटर हॉस्पिटलच्या विस्ताराला मोठी चालना; मुंबईच्या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत होणार

मुंबई – 

ज्युपिटर लाइफ लाईन हॉस्पिटल्स लिमिटेडने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील प्रमुख भूखंडासाठीची निविदा जिंकली असून, आवश्यक वैधानिक व नियामक मंजुरीनंतर सुमारे ४०० खाटांचे रुग्णालय उभारण्याची योजना कंपनीने जाहीर केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंपनीच्या निविदेला मान्यता देत ८० वर्षांच्या दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर जमीन वाटप करण्यास संमती दिली आहे. जीटीएक्सटी ब्लॉकमधील प्लॉट क्रमांक एसएफ-५ येथे असलेला हा भूखंड सुमारे १०,०२६ चौ. मी. क्षेत्रफळाचा असून, यासाठी ₹३५४ कोटींचा एकरकमी भाडेपट्टा प्रीमियम निश्चित करण्यात आला आहे.

Bkc voice of eastern
वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी)

प्रस्तावित प्रकल्प ज्युपिटर हॉस्पिटल्ससाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक विस्तार मानला जात असून, कंपनीच्या वेगवान वाढीच्या प्रवासाला तो अधोरेखित करतो. बीकेसी प्रकल्पामुळे उच्च-विकासक्षम शहरी बाजारपेठांमध्ये समूहाची उपस्थिती अधिक बळकट होण्याबरोबरच मुंबईतील महत्त्वाच्या व्यावसायिक व पायाभूत सुविधांच्या पट्ट्यात प्रगत तृतीयस्तरीय आरोग्यसेवा उपलब्धता वाढण्याची अपेक्षा आहे.

आरोग्य पायाभूत सुविधांच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. भारतात लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णालयीन खाटांची उपलब्धता वाढविण्यावर भर दिला जात असताना, बीकेसीमधील ४०० खाटांचे हे रुग्णालय मुंबईकरांसह देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय रुग्णांना दर्जेदार उपचार सेवा उपलब्ध करून देईल. वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्याच्या शासनाच्या “हील इन इंडिया” उपक्रमाशीही हा प्रकल्प सुसंगत आहे.

Jupiter चे हे सातवे रुग्णालय

ज्युपिटर लाइफ लाईन हॉस्पिटल्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित ठक्कर म्हणाले, “बीकेसी हे देशातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे प्रस्तावित ज्युपिटर हॉस्पिटल मुंबई आणि भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण भर घालेल. हे आमचे सातवे रुग्णालय असून, यामुळे सुमारे ३००० खाटांच्या क्षमतेकडे आमची वाटचाल दृश्यमान होते. पश्चिम भारतातील विस्तार सुरू ठेवत आम्ही ‘रुग्ण प्रथम’ या आमच्या तत्त्वाशी कायम वचनबद्ध आहोत.”

हेही वाचा : Mumbai University : कलिना संकुलात ६ इमारतींवर सौर ऊर्जा प्रणाली

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत