Night school result : मॉडर्न नाईट हायस्कूलचा ८० टक्के निकाल

गोरगरीब, कष्टकरी, दिवसा काम करून रात्री शिक्षण घेता येत असलेली रात्रशाळा मॉडर्न नाईट हायस्कूल

मुंबई :

इयत्ता दहावी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ रोजी इयत्ता दहावीचे एकूण १५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेले होते. या विद्यार्थी गटातून वय वर्ष ५६ च्या पुढे असलेल्या आशाताई कांबळे यांना ५८.४० टक्के व शारदा यशवंत गोताड ७२.२० टक्के, प्रियांका अंकुश कांबळे ७१.६० टक्के या तीन विद्यार्थिनी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये कष्ट करून आपली दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली.

आशाताई कांबळे या मुंबई सेंट्रल विभागामध्ये घरकाम करतात. घर काम करून रात्री शिकण्यासाठी या शाळेमध्ये त्या येत होत्या. अथक परिश्रम करून विरार ते मुंबई सेंट्रलचा रेल्वेचा प्रवास करून रात्र शाळेमध्ये रात्री ९.३० वाजेपर्यंत शाळेच्या वेळेत थांबून पुन्हा दुसऱ्या दिवशी विरारवरून मुंबई सेंट्रलमध्ये काम करून पुन्हा रात्र शाळेत शिकण्यासाठी थांबण्याची त्यांची जिद्द यामुळे त्यांना आज अभूतपूर्व यश संपादित झालेले आहे. आज मॉडर्न नाईट हायस्कूल या रात्र शाळेचा निकाल ८० टक्के एवढा लागलेला आहे. वयाच्या साठीच्यामध्ये सुद्धा इयत्ता दहावी चांगल्या गुणांनी पास होता येतं हे, घर काम करूनही शिक्षण पूर्ण करता येते. या मॉडर्न नाईट हायस्कूलमधील रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की शिक्षणाला वयाची अट व जीवनातील अडथळे महत्त्वाचे नसतात त्यावर मात करून यश संपादित करता येते. त्यामुळे मुख्याध्यापक निरंजन गिरी व शाळेतील एकमेव ज्येष्ठ शिक्षक दीपक सरोदे यांनी विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केले आहे. या विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना पुढील शैक्षणिक मार्गदर्शन ते सतत करत राहणार असे त्यांनी सांगितलेले आहे.

मॉडर्न Night हायस्कूल ही रात्र शाळा १९३३ ची रात्र शाळा

दक्षिण मुंबईतील मॉडर्न नाईट हायस्कूल ही रात्र शाळा १९३३ ची रात्र शाळा म्हणून ओळखली जाते. जवळपास देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची व महाराष्ट्र शासन अस्तित्वात येण्याच्या आधीची सर्वात जुनी रात्र शाळा म्हणून ओळखली जाते. या रात्र शाळेत महाराष्ट्राचे प्रथम शिक्षण मंत्री बाळासाहेब जोशी, सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव चव्हाण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, पु. ल. देशपांडे, डॉ.वर्तक, बा.सी मर्ढेकर, दादासाहेब रेगे, भारत सरकारचे ऊर्जामंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात प्रथम असलेले न्यायाधीश, मुंबई महानगरपालिकेचे महापौर, शिक्षणाधिकारी, मुंबई उच्च न्यायालयाचे महिला न्यायाधीश, मनोहर जोशी अजून बरेच ऐतिहासिक वारसा लाभलेले दिग्गज नेते मंडळी या रात्र शाळेमध्ये येऊन गेलेले आहेत. या रात्र शाळेमध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे काही काळ संस्थेत कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी शाळेचे काम पाहिलेले आहे. परंतु कालांतराने सदर नावाजलेली रात्र शाळा १९८४ नंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मानस पुत्र म्हणून प्रसिद्ध असलेले वणवे गुरुजी यांच्या पश्चात रात्र शाळेला उतरती कळा लागली. सद्यस्थितीत दक्षिण मुंबईतील गोर गरीब कष्टकरी दिवसा काम करून आपले राहिलेले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शाळा दिवस-रात्र काम करत आहे शाळेचे मुख्याध्यापक निरंजन गिरी हे पूर्णवेळ रात्र शाळेसाठीच काम करत आहेत. मुख्याध्यापक निरंजन गिरी यांच्या पुढाकारामुळे सदर रात्र शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाची मुक्त शाळा केंद्र म्हणून मान्यता घेण्यात आलेली आहे. या रात्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नियमित व मुक्त शाळा केंद्र माध्यमातून शिकविले जाते.

हेही वाचा : 10th Result : राज्याचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी घसरला

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत