Mumbai University : पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन नोंदणी सुरू

प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यास सुरुवात, १२ वी निकालानंतर भाग २ भरता येणार असून प्रवेश प्रक्रीयेचे वेळापत्रक होणार जाहीर

मुंबई – 

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेला मुंबई विद्यापीठाकडून सुरुवात करण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन भागामध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालापूर्वी अर्जाचा पहिला भाग तर बारावीच्या निकालानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.

मुंबई विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या https://muugadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर प्रवेश पूर्व नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नावनोंदणी दोन भागात करायची आहे. त्यानुसार अर्जाचा भाग १ हा बारावीच्या निकालापूर्वी भरायचा आहे. तर बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सविस्तर काळजीपूर्वक अर्ज भरावेत असे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

लॉगिन आयडीमध्ये सविस्तर माहिती भरणे आवश्यक

विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाने दिलेल्या https://muugadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी प्रथम लॉगिन आयडी तयार करावे. त्यानंतर लॉगिनमधील प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यामध्ये स्वतःची माहिती, नाव, पत्ता, शैक्षणिक पतपेढी (ॲकेडमिक बँक ऑफ क्रेडिट्स – एबीसी ) आयडी, शैक्षणिक अर्हता, आरक्षण, फोटो, सही आणि संपर्क क्रमांक ही माहिती भरायची असल्याचेही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळ यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

एबीसी आयडी तयार करणे आवश्यक

पदवी अभ्यासक्रमास प्रवेशपूर्व नोंदणीमध्ये विद्यार्थ्यांस कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्याची नोंद करणे आवश्यक आहे. प्रवेश पूर्व नोंदणी करीता एबीसी आयडी आवश्यक आहे. प्रवेशासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला एबीसी आयडी हा www.abc.gov.in या लिंक वर जाऊन तयार करून घ्यावा. प्रवेश पूर्व नोंदणीची लिंक संकेतस्थळावर ‘प्रवेश’ (ॲडमिशन) या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

हेही वाचा : CBSE Result : ९३.७० टक्के; मुलींची पुन्हा बाजी मारली

स्वायत्त, अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त पदवी संस्था तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे व संस्थांचे विभाग प्रमुख, संचालक, प्राचार्य, संचालक स्वायत्त महाविद्यालये व संस्था, उपपरिसर (ठाणे, कल्याण व रत्नागिरी) मधील प्राचार्यांना याबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *