Mumbai suburbs : जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी जाहीर

मुंबई –

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी केंद्रांच्या माध्यमातून ॲथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक क्रीडा प्रकारात सुमारे २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी voice of eastern
क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी

जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करावी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रातून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून दर्जेदार प्रशिक्षण देण्याबरोबरच न्यूट्रिशन व पूरक आहार, भोजव व्यवस्था, क्रीडा साहित्य, वैद्यकीय तपासण्या आणि देश-विदेशातील प्रशिक्षणासाठी आवश्यक सहकार्य केले जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू केल्यानंतर आता मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा प्रतिमा विकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून मुंबई उपनगरमधील ॲथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे. या निवड चाचणीतून प्रत्येक क्रीडा प्रकारात सुमारे २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही खेळाडूंना https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeeVvJ-mq0y4H2n_UXiF4tQiNy7UM0AdA3BbMGfZdWTY2iEQA/viewform?usp=publish-editor⁠ या लिंक नोंदणी करायची आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिल २०२६ असून निवड चाचणीची तारीख व स्थळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

Mumbai suburbs जिल्ह्यातील सर्व पात्र खेळाडूंना आवाहन

खेळाडूंनी  निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रे व ३ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी ८८९८०९०९०७, ९०२९२५०२६८, ८१०८६१४९११, ८२०८३७२०३४ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे किंवा mishanlakshvedhmumsub@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व पात्र खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा : Mumbai University ची प्रतिमा मलीन करण्याचा राजेश  बलखंडे यांचा प्रयत्न

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत