Sewri : शिवडीकरांना मिळणार रेल्वे स्थानकासमोर नवा रस्ता 

मुंबई : 

सद्यस्थितीमध्ये शिवडी स्टेशन समोर शिवडी वरळी लिंक रोडचं काम चालू आहे. त्याच लिंक रोडला समांतर शिवडी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला जोडणाऱ्या ब्रीजचे काम देखील थोड्या दिवसात चालू होणार आहे. सद्यस्थितीमधे चालू असलेल्या शिवडी वरळी लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यावर या ब्रीज खालील जागेत म्हणजेच शिवडी बी.डी.डी. इमारत क्रमांक ९ व ८ मधील जागा ही डी.पी. रोड साठी आरक्षित करण्यात यावी. अशी मागणी स्थानिक शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी मनपाकडे पत्राद्वारे केली होती.

शिवडी रस्ता - voice of eastern
शिवडी रस्ता

Sewri : मनपाकडून सकारात्मक प्रतिसाद

याचा त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर याची सकारात्मक दखल मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली असून म.न.पा. च्या वतीने सदर जागा ही डी.पी रोड साठी आरक्षित ठेवण्याचे निश्चित झाले असून सदर ठिकाणी स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी मुंबई मनपा एफ दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता रोशन जीभकाटे तसेच कनिष्ठ अभियंता सतीश कांबळे यांच्या सोबत स्थळ पाहणी केली. काही सूचना केल्या. यानंतर सदर डी.पी. रोड संदर्भातला परिपूर्ण प्रस्ताव मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर तसेच शिवडी वरळी ब्रीज चे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा रोड तयार करून शिवडीकर नागरिकांसाठी मोकळा केला जाईल.

हेही वाचा : Cleanliness Drive : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – लोढा

सद्यस्थितीमध्ये नागरिकांना चालण्यासाठी सदर ठिकाणी इमारत क्रमांक ९ हनुमान मंदिराचा बाजूने छोटा मार्ग उपलब्ध आहे. परंतु भविष्यात हा २० मीटर पेक्षा जास्त रुंदीचा रोड उपलब्ध होणार आहे. जेणेकरून नागरिकांना स्टेशन बाहेरून वाहनाद्वारे डायरेक्ट झकेरिया बंदर रोड वर येता येईल.

सद्यस्थितीमध्ये नागरिकांना चालण्यासाठी सदर ठिकाणी इमारत क्रमांक ९ हनुमान मंदिराचा बाजूने छोटा मार्ग उपलब्ध आहे. परंतु भविष्यात हा २० मीटर पेक्षा जास्त रुंदीचा रोड उपलब्ध होणार आहे.
– सचिन पडवळ, शिवसेना नगरसेवक
शिवडी काळाचौकी

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत