विनायक निम्हण State Carrom : अभिजित, झैद उपांत्य फेरीत दाखल

मुंबई : 

सनी निम्हण यांच्या पुढाकाराने व सोमेश्वर फाऊंडेशनच्यावतीने आणि झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने सनिज वर्ल्ड, सनी स्पोर्ट्स किंग्डम, पुणे येथे आज कै. विनायक निम्हण तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य सामन्यात स्पर्धेतील प्रथम मानांकन प्राप्त केलेल्या पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला विजय मिळवताना तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली.

Carrom : ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२०२६
विनायक निम्हण राज्य कॅरम

उदयोन्मुख ठाण्याच्या कुणाल राऊतने त्याला पहिला सेट २३-९ असा एकतर्फी हरवून सामन्यावर आपली छाप पाडली होती. परंतु संयम राखत अनुभवाच्या जोरावर अभिजितने दुसरा सेट १३-२ असा जिंकला व सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या व अंतिम सेटमध्ये अभिजितने आपला खेळ अधिक आक्रमक केला व २५-११ असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे ठाण्याच्या झैद अहमदने पुण्याच्या रहिम खानवर चुरशीचा विजय मिळवला. हा सामना तीन सेटपर्यंत रंगला. या सामन्यात ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या रहिमवर २३-८, १०-१६, २५-० असा विजय नोंदवला.

Do Originals advt
Do Originals advt

State Carrom : पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे फेरीचे निकाल

प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि निलांश चिपळूणकर ( मुंबई ) २५-१६, २२-१५
सागर वाघमारे ( पुणे ) वि वि संदीप दिवे ( जळगाव ) २५-४, २५-९

State Carrom : महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल

केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) वि वि ऐशा साजिद खान ( मुंबई ) २५-२, २२-१९
आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि तनया पाटील ( पुणे ) २५-९, २५-०
मधुरा देवळे ( ठाणे ) वि वि मैत्रेयी गोगटे ( मुंबई ) २२-१८, १५-१९, २४-९
प्राजक्ता नारायणकर ( मुंबई ) वि वि समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) १९-२०, २३-१७, २५-१८

हेही वाचा : Wild Vegetable Festival : कोसबी-फुरूस विद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत