राज्यात १०० ‘महात्मा फुले Skill Training केंद्र’ उभारणार

मुंबई – 

राज्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात १०० ‘महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. आगामी काळात या केंद्रांची संख्या टप्प्याटप्प्याने १,००० पर्यंत वाढविण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अश्विनी भिडे यांची भेट घेऊन विविध नागरी प्रश्नांसह कौशल्य विकास केंद्रांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये या केंद्रांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची विनंती महापालिका प्रशासनाला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पदवी असून चालणार नाही, Skill ची आवश्यकता

या योजनेअंतर्गत शिक्षणासोबतच कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून, नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशी रचना या केंद्रांची असेल. विशेषतः शहरी भागातील गरजांनुसार विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे. झोपडपट्टी भागातही ही केंद्रे सुरू करून वंचित घटकांपर्यंत कौशल्य प्रशिक्षण पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. “फक्त पदवी असून चालणार नाही, तर त्यासोबत कौशल्य असणे आवश्यक आहे. यामुळेच तरुणांना अधिक रोजगार संधी उपलब्ध होतील,” असे मत लोढा यांनी व्यक्त केले. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये या केंद्रांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची विनंती महापालिका प्रशासनाला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील इतर पायाभूत सुविधांबाबतही बैठकीत चर्चा झाली. हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प उभारणे, तसेच सायन परिसरातील ‘अम्मान देखनी’ संस्थेजवळील डीपी रोडवरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याबाबतही महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.

रोजगारनिर्मितीसाठी राज्य सरकार आणि महापालिका एकत्रितपणे काम करेल

मुंबईतील विकासकामे आणि तरुणांच्या रोजगारनिर्मितीसाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन एकत्रितपणे काम करेल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. शहरातील इतर पायाभूत सुविधांबाबतही बैठकीत चर्चा झाली. हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प उभारणे, तसेच सायन परिसरातील ‘अम्मान देखनी’ संस्थेजवळील डीपी रोडवरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याबाबतही महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.

हेही वाचा : Nanavati Hospital : जन्मतः अंगठा नसलेल्या चिमुकलीवर यशस्वी ‘टो-टू-हँड’ सर्जरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *