Traffic block : लोकमान्य टिळक टर्मिनसवर ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक
अनेक एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम
मुंबई :
प्रवासी सुविधांचा विस्तार आणि विविध पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे २४ ते २६ जून या कालावधीत ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक मेल व एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. तर काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
हा ब्लॉक २४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २६ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. यामध्ये शंटिंग नेकचे बांधकाम, सिक साइडिंगमध्ये बदल, देखभाल साइडिंग यार्डाचा विस्तार, पिट लाईन्सचे विस्तारकाम तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या निचरा वाहिन्यांचे स्थलांतर अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.
हेही वाचा : Mumbai University : चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच स्टेशनवर येण्याचे आवाहन केले आहे. ब्लॉक कालावधीत एलटीटीकडे येणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
Traffic block : ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट होणार
- २२१८० चेन्नई – एलटीटी एक्सप्रेस
- १६३४६ तिरुवनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस
- १५०१८ गोरखपूर – एलटीटी एक्सप्रेस
वेळेत बदल :
- १२१४१ एलटीटी – पाटलिपुत्र एक्सप्रेस ही २४ जून रोजी रात्री ११.३५ वाजता सुटणारी ही गाडी आता २५ जून रोजी पहाटे ३.३० वाजता सुटेल.
Traffic block : २५ जून रोजी या गाड्यांवर परिणाम
शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:
- २२५३७ गोरखपूर – एलटीटी कुशीनगर एक्सप्रेस
- १२६२० मंगळुरू सेंट्रल – एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस
- १६३४६ तिरुवनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस
- १५०१८ गोरखपूर – एलटीटी एक्सप्रेस
- २२११० बल्हारशाह – एलटीटी एक्सप्रेस
- २२११२ अयोध्या कॅन्ट – एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस
वेळेत बदल :
- २२११५ एलटीटी – करमळी वातानुकूलित एक्सप्रेस रात्री १२.५० ऐवजी पहाटे ३.१५ वाजता सुटेल.
- १२१६७ एलटीटी – बनारस एक्सप्रेस ही गाडी रात्री १०.४५ ऐवजी २६ जून रोजी पहाटे ३.३० वाजता सुटेल.
- १२१४१ एलटीटी – पाटलिपुत्र एक्सप्रेस रात्री ११.३५ ऐवजी २६ जून रोजी पहाटे ३.४५
२६ जून रोजी या गाड्या ठाण्यापर्यंतच
- २२५३७ गोरखपूर – एलटीटी कुशीनगर एक्सप्रेस
- २२३५८ गया – एलटीटी एक्सप्रेस
- २५ जून रोजी प्रवास सुरू केलेल्या:
- १२६२० मंगळुरू सेंट्रल – एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस
- १६३४६ तिरुवनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस
- १२८८० भुवनेश्वर – एलटीटी एक्सप्रेस
वेळेत बदल :
- ११०९९ एलटीटी – मडगाव एक्सप्रेस : १२.४५ ऐवजी पहाटे ३.३०
- ०११४३ एलटीटी – दानापूर एक्सप्रेस : सकाळी १०.३० ऐवजी दुपारी १.३०
- १२१०१ एलटीटी – शालीमार एक्सप्रेस : १०.३५ ऐवजी रात्री ९.३५
- १२१६७ एलटीटी – बनारस एक्सप्रेस : रात्री १०.४५ ऐवजी २७ जून रोजी पहाटे ३ वाजता



