Press Enclave बुद्धिबळ स्पर्धा : अमोघ शर्मा टायब्रेकवर विजेता

मुंबई :

प्रतिक्षानगर येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या प्रेस एन्क्लेव्ह १६ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत अमोघ शर्माने टायब्रेकच्या आधारे विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या अखेरीस चार खेळाडूंनी समान गुण मिळवल्याने निकालासाठी टायब्रेकचा आधार घ्यावा लागला. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, अंतिम फेरीपर्यंत सामने अत्यंत चुरशीचे झाले.

प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा विजेते खेळाडू voice of eastern
प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा विजेते खेळाडू — डावीकडून उपविजेता समर चव्हाण, विजेता अमोघ शर्मा आणि तृतीय क्रमांक विजेता अमोघ येल्लुरकर

चौथ्या फेरीनंतर गतविजेता समर चव्हाण चार गुणांसह आघाडीवर होता. मात्र पाचव्या फेरीत युवान तावडेकडून त्याला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाचव्या फेरीनंतर समर चव्हाण, अमोघ शर्मा, अमोघ येल्लुरकर आणि युवान तावडे या चारही खेळाडूंचे प्रत्येकी चार गुण झाले. टायब्रेकमध्ये सरस गुणगतीमुळे अमोघ शर्माला विजेता घोषित करण्यात आले. समर चव्हाण याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर अमोघ येल्लुरकरने तृतीय क्रमांक पटकावला. युवान तावडे चौथ्या स्थानावर राहिला. विशेष बाब म्हणजे मागील वर्षी याच स्पर्धेत टायब्रेकमध्ये समर चव्हाण विजेता ठरला होता, तर अमोघ शर्मा उपविजेता राहिला होता.

हेही वाचा : MSRTC : मध्यवर्ती कार्यालयात अनोळखी व्यक्तीची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हुज्जत

विजेत्या अमोघ शर्माला कै. सदानंद चव्हाण यांच्या स्मरणार्थ २,५०० रुपये, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या समर चव्हाणला कै. नंदकुमार जांभेकर यांच्या स्मरणार्थ १,५०० रुपये, तर तृतीय क्रमांकावरील अमोघ येल्लुरकरला कै. सुमित्रा राजाराम पराडे यांच्या स्मरणार्थ १,००० रुपये, चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक राजन पिंगळे आणि निशांत येल्लुरकर यांच्या हस्ते पार पडला.

हेही वाचा : मुंबई व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद Kho-Kho स्पर्धा : मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व विद्यार्थी क्रीडा केंद्राचे वर्चस्व

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत