Kho-Kho : कुरुक्षेत्रवर महाराष्ट्राची धमाकेदार सुरुवात

हरियाणा :

कुरुक्षेत्र (हरियाणा) येथील थीम पार्क मैदानावर सुरु झालेल्या ३५ व्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयी सलामी देत आपली ताकद ठसठशीतपणे दाखवून दिली. वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि भक्कम संरक्षणाच्या जोरावर महाराष्ट्राने साखळी सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत स्पर्धेत आपली विजयाची दावेदारी निर्माण केली.

किशोरी गट : महाराष्ट्राची आंध्रप्रदेशवर एकतर्फी मात

किशोरी गटातील एका सामन्यात महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच सामना आपल्या बाजूने झुकवला. महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर एक डाव ३४ गुणांनी ४२–८ असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राकडून पियुषा पानमाळकर (३.१० मि. संरक्षण), अपर्णा वर्दे (२.५० मि. संरक्षण व २ गुण), ऋतुजा सुरवसे (२.५० मि. संरक्षण व ८ गुण), वेदिका तामखडे (२.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रभावी कामगिरी करत विजय साकारला. आंध्रप्रदेशकडून एस. मीना हिने एकाकी प्रतिकार केला.

किशोर गट : पश्चिम बंगालची उत्तर प्रदेशवर काठावरची सरशी

दुसऱ्या किशोरी सामन्यात पश्चिम बंगालने उत्तर प्रदेशवर ५ गुण व २ मि. ५ सेकंद राखून ३९–३४ असा थरारक विजय मिळवला. पश्चिम बंगालकडून अमृता दास (१.३५ मि., नाबाद १ मि. संरक्षण व ४ गुण), अनुषा मंडल (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), कुकु माझी (१ मि. व १.४० मि. संरक्षण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. उत्तर प्रदेशकडून आरोही कुमारी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), साक्षी कुमारी (१ मि. संरक्षण व १२ गुण) यांनी झुंज दिली.

महाराष्ट्राचा पॉंडेचेरीवर ठसठशीत विजय voice of eastern
महाराष्ट्राचा पॉंडेचेरीवर ठसठशीत विजय

किशोर गट : महाराष्ट्राचा पॉंडेचेरीवर ठसठशीत विजय

किशोर गटातील सामन्यात महाराष्ट्राने पॉंडेचेरीवर २१ गुणांनी ३५–१४ असा स्पष्ट विजय मिळवला. महाराष्ट्राकडून विक्रमसिंग राठोड (नाबाद २.२० मि. संरक्षण व २ गुण), वेदांत गायकवाड (१२ गुण), कर्तव्य गाडेकर (२.१० मि. संरक्षण) यांनी दमदार कामगिरी नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. पॉंडेचेरीकडून आर. विश्वनाथ (१ मि. संरक्षण), एम. दिबिनेश (१ मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले.

Kho-Kho विजयाचा आत्मविश्वास, पुढील लढतींकडे लक्ष

पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) संघांनी दाखवलेला आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ पाहता पुढील साखळी सामन्यांतही महाराष्ट्राकडून अशीच दमदार कामगिरी अपेक्षित आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची खो-खो परंपरा अधिक बळकट होत असल्याचे हे सामने ठळकपणे अधोरेखित करतात.

हेही वाचा : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल; Budget विकासाला नवी गती देणारा – मंगलप्रभात लोढा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *