Fyjc admissions : अकरावी प्रवेशाची तिसरी यादी २३ जूनला

आतापर्यंत सहा लाख ३५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

मुंबई :

राज्यभरातील १३ लाख ७६ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर आतापर्यंत तब्बल ६ लाख ३५ हजार २६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तिसऱ्या नियमित फेरीची प्रवेश यादी २३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार असून, या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २५ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची संधी असेल.

11th admission : प्रवेश प्रक्रियेसाठी या तारखेपासून भरात येणार अर्ज
अकरावी प्रवेश प्रक्रिया

राज्यातील ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी आतापर्यंत १३ लाख ७६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. दुसऱ्या नियमित फेरीसाठी ५ लाख ९७ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरून सहभाग नोंदवला होता. त्यापैकी २ लाख ६५ हजार ५६२ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले. १६ जूनपर्यंत १ लाख ९० हजार ७६६ विद्यार्थ्यांनी नियमित फेरीत प्रवेश निश्चित केला, तर विविध कोट्यांमधून ३१ हजार १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे एकूण प्रवेशसंख्या ६ लाख ३५ हजार २६ वर पोहोचली आहे.

हेही वाचा :  Tukaram Mundhe : मुंबईकरांना भेसळयुक्त सॉसचा धोका; तुकाराम मुंढेची कारवाई

प्रवेश प्रक्रियेतील रिक्त जागा भरून काढण्यासाठी शिक्षण संचालनालयाने तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या फेरीत नवीन विद्यार्थ्यांनाही नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १८ जून दुपारी ३ वाजल्यापासून २० जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची मुदत असेल. त्यानंतर २३ जून रोजी प्रवेश यादी जाहीर होईल.

मुंबई विभागात आतापर्यंत सर्वाधिक ४० हजार १५३ प्रवेश निश्चित झाले आहेत. त्याखालोखाल पुणे विभागात ३२ हजार १०४, नाशिकमध्ये २० हजार ९८७ आणि नागपूरमध्ये २० हजार ४१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असल्याने तिसऱ्या फेरीत अनेक विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

Fyjc admissions : तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक

  • नवीन नोंदणी, अर्ज दुरुस्ती व पसंतीक्रम भरणे – १८ ते २० जून (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
  • जागा वाटप प्रक्रिया – २१ ते २२ जून
  • तिसरी प्रवेश यादी जाहीर – २३ जून (सकाळी १० वा.)
  • विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे – २३ जून (दुपारी १२ वा.) ते २५ जून (सायं. ६ वा.)
  • चौथ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर – २६ जून
  • रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध – २७ जून (सायं. ५ वा.)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत