Tukaram Mundhe : मुंबईकरांना भेसळयुक्त सॉसचा धोका; तुकाराम मुंढेची कारवाई

मुंबई :

खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार एफडीएने साकीनाका परिसरातील मे. रती एंटरप्राइजेस या सॉस उत्पादन करणाऱ्या आस्थापनेवर कारवाई केली. या कारवाईमध्ये भेसळ असलेला तसेच गुणवत्तेबाबत संशय निर्माण करणारा चिली आणि सोया सॉस जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला मालाची किमत २ हजार ५१० रुपये इतकी होती.

Tukaram mundhe - voice of eastern
तुकाराम मुंढे

अन्न व औषध प्रशासनाने १६ जून रोजी साकीनाका येथील खैरानी रोडवरील मे. रती एंटरप्राइजेस या सॉस उत्पादन करणाऱ्या कंपनीवर छापा टाकला. या छाप्यात तपासणीदरम्यान उत्पादन प्रक्रियेतील अटींचे पालन होत नसल्याचे, उत्पादनावरील लेबलिंगमध्ये विविध त्रुटी असल्याचे तसेच उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत व भेसळीबाबत संशय निर्माण करणाऱ्या बाबी निदर्शनास आल्या. त्याअनुषंगे चिली सॉस आणि सोया सॉस या उत्पादनांचा एकूण २ हजार ५१० लिटरचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किमत ३२ हजार ६३० रुपये इतकी आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी आणि सहाय्यक आयुक्त प. रा. सिंगरवाड (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रसाद सावंत, अभिजीत धनवडे, महेंद्र बांदल, सुदर्शन सुरवसे, तुषार शेळके यांनी ही कारवाई केली.

Tukaram Mundhe : अधिकृत नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविले

या कारवाईमध्ये उत्पादनांचे अधिकृत नमुने विश्लेषणासाठी घेऊन ते मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अन्वये आवश्यक ती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या आस्थापनेतील त्रुटींचे गांभीर्य लक्षात घेता आस्थापनेस पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिली आहे.

हेही वाचा : Tukaram mundhe : मुंबईमध्ये बेकायदा सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांचे पेव

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत