Traffic block : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक ब्लॉक

बोरघाट मार्गे मुंबई वाहिनीवरील सर्व जड-अवजड वाहनांची वाहतूक पुर्णत: बंद

मुंबई :

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रॉकफॉल प्रतिबंधात्मक कामाअंतर्गत बसविण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकलेले दगड काढण्याचे काम १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरुन बोरघाट मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत.

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक ब्लॉक - voice of eastern
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक ब्लॉक

बोरघाट मार्गे मुंबई वाहिनीवरील कि.मी. क्र. ५९.००० पासून सर्व जड-अवजड वाहनासांठी वाहतूक वरील कालावधीमध्ये  पुर्णत: बंद राहणार आहे. बोरघाट मार्गे पुणे वाहिनी वरील कि.मी. क्र.३०/००० पासून सर्व जड-अवजड वाहनासांठी वाहतूक पुर्णत: कामाच्या वेळी बंद राहील. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस, प्रवासी वाहने ही वाहतूक कि.मी. क्र. ५९/००० पासून कनेकटींग लिंक मार्गे मुंबईकडे सुरु राहणार आहे.

Traffic block : १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत

मुंबईकडून पुण्याकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस / प्रवासी वाहने ही कि.मी. क्र ३९/०० येथून कनेकटींग लिंक मार्गे पुणेकडे सुरु राहणार आहे. लोणावळा व खंडाळा येथून मुंबईकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस, प्रवासी वाहने तसेच जड-अवजड वाहने द्रुतगती वरील कि.मी. क्र. ४५/०० येथे थांबविण्यात येतील. त्यामुळे या कालावधीत वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करावे. तसेच वरील कालावधी दरम्यान अडचण आल्यावर मदतीसाठी द्रुतगती मार्गाच्या नियत्रंण कक्षाचा दूरध्वनी क्र. ९८२२४९८२२४ व महामार्ग पोलीस विभागाचा दूरध्वनी क्रमांक ९८३३४९८३३४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Rising heat : वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या सत्रात शाळा नको

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत