Cooper Hospital : कर्करोग रुग्णांसाठी केमोथेरपी उपचार केंद्र सुरू

पश्चिम उपनगरातील कर्करोगग्रस्तांना दिलासा

मुंबई :

वाढती कर्करोग रुग्णांची संख्या लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील नागरिकांना घराजवळ उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने कूपर रुग्णालयामध्ये केमोथेरपी उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरासह वसई, विरार व पालघरमधील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Cooper Hospital - voice of eastern
कूपर रुग्णालय

पश्चिम उपनगरातील कर्करोगग्रस्तांना केमोथेरपी सारख्या उपचारांसाठी टाटा रुग्णालयामध्ये जावे लागते. केमोथेरपी केल्यानंतर रुग्णांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असते. अशावेळी केमोथेरपी केल्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा घर गाठताता अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णांची होणारी ही गैरसोय लक्षात मुबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये स्वतंत्र केमोथेरपी केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्थानिक आमदार अमित साटम यांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कूपर रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या सी विंगमध्ये चौथ्या मजल्यावर उभारण्यात येत असलेल्या या केंद्रासाठी आवश्यक तयारी झाली असून, इलेक्ट्रिक, डॉक्टर रुम, रुग्णांसाठी खाटा यांचे नियोजन करण्याचे काम सध्या सुरू आहे. या विभागासाठी कर्करोगतज्ज्ञ डॉ. श्रेया गट्टाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी महिनाभरापूर्वी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. हा बाह्यरुग्ण विभाग दर मंगळवारी दुपारी १.३० वाजता असतो. डॉ. श्रेया या आठवड्यातील पाच दिवस प्रत्येक रुग्णकक्षामध्ये जाऊन तेथील रुग्णांची माहिती घेत आहेत. महिनाभरामध्ये या बाह्यरुग्ण विभागामध्ये ११ रुग्ण उपचारासाठी आले असून, त्याची तपासणी व समुपदेशनाची प्रक्रिया सुरू आहे. उपचारासाठी आलेल्या ११ रुग्णांपैकी एका रुग्णावर केमोथेरपी उपचार सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित १० जणांच्या विविध तपासण्या सुरू आहे. केमोथेरपीसाठी रुग्णांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.

Cooper Hospital : रुग्णांना औषधासाठी ट्रस्टचे सहकार्य

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील असतात. केमोथेरपीच्या एका चक्रासाठी साधारणपणे २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. असे अनेक चक्र करावे लागत असल्याने हा खर्च साधारणपणे ३ लाखांपासून २५ लाखांपर्यंत येतो. त्यामुळे रुग्णांना कर्करोगावरील उपचार परवडणारे नसतात. ही बाब लक्षात घेत रुग्णांना औषधोपचारासाठी बुधराणी ट्रस्टकडून मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे रुग्णांना केमोथेरपीसाठी कोणताही आर्थिक ताण सहन करावा लागणार नाही.

हेही वाचा : Institute-level round : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या निरीक्षकाची नियुक्ती होणार 

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत