‘हब आणि स्पोक मॉडेल’ राबवून organ donation चळवळ राबवा

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश 

मुंबई :

महाराष्ट्रातील अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भायंदर व मुंबई (वाडिया) येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

हब अँड स्पोक मॉडेल voice of eastern
हब अँड स्पोक मॉडेल

आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली पाहिजे आणि अधिकाधिक रुग्णांना वेळेत अवयवरुपी नवजीवन मिळाले पाहिजे. त्यासाठी शासकीय रुग्णालयांमधील अवयवदान प्रक्रिया अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. विशेषतः ब्रेन-डेड (मेंदू मृत) रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रभावी समुपदेशन करून अवयवदानासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणेची गरज आहे.

अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाला मिळणारी नवी आशा आहे. हे पुण्याईचे आणि नवजीवन देण्याचे कार्य असल्याचा दृष्टिकोन समाजात रुजवला गेला पाहिजे, अवयवदान चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असून, दात्यांची संख्या मोठ्या वाढवण्यासाठी राज्यभर जनजागृती, समुपदेशन आणि संस्थात्मक यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील ब्रेन-डेड प्रकरणांचा दर दोन महिन्यांनी आढावा घ्यावा अशा सुचना दिल्या आहेत.

organ donation समुपदेशनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा

राज्यातील सर्व उपसंचालकानी अवयवदानाबाबत राज्यभर विशेष जनजागृती मोहीम राबवावी. संदर्भित रुग्णालयात अवयवदान समुपदेशन व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती/प्रशिक्षण करून प्रत्यारोपण सेवेला गती द्यावी. अवयवदान विषयक वर्कशॉप, जनजागृती मेळावा आणि प्रशिक्षण सत्रे नियमित आयोजित करावीत. राज्यातील ब्रेन-डेड प्रकरणांचा दर दोन महिन्यांनी आढावा घ्यावा अशा सुचना दिल्या आहेत.

या बैठकीत संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती, संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक, औध सिव्हिल हॉस्पिटल पुणे , ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, पं. भीमसेन जोशी हॉस्पिटल मीरा-भायंदर, या रुग्णालयानी अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील कार्याचे सादरीकरण केले. बैठकीत वाडिया रुग्णालयाने लहान मुलांच्या लिव्हर ट्रान्सप्लांट क्षेत्रातील कामाचे सादरीकरण केले. तसेच टेलिमेडिसिनच्या माध्यमातून राज्यातील विविध रुग्णालयांना तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जात असल्याची माहिती दिली. राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी सहा प्रादेशिक हब तयार करून प्रत्यारोपण सेवा अधिक बळकट करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बैठकीस राज्यातील सर्व उपसंचालक, वैद्यकीय अधिकारी व संबंधित तज्ज्ञ ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

हेही वाचा : STचे अकार्यकारी अधिकारी मोकाट; नेमलेली चौकशी समिती अर्धवटच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *