STचे अकार्यकारी अधिकारी मोकाट; नेमलेली चौकशी समिती अर्धवटच

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांचा आरोप.

मुंबई :

एसटी महामंडळातील विविध विभागामध्ये भ्रष्टाचार तसेच इतर आरोप असलेल्या १७ अकार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी प्रशासनाने समिती नेमली आहे. आरोप असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचे स्वरूप वेगळे असल्याने समितीतील सदस्य अधिकाऱ्यांना कुणाला, कुठले काम द्यावे या बाबतीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. समितीचे काम धीम्यागतीने सुरू असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी अजूनही मोकाटच असल्याचा आरोप काँग्रेसच्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला.

Shrirang barge voice of eastern
श्रीरंग बरगे

महामंडळाला खरोखरच फलनिष्पत्ती आवश्यक असेल तर दिखावा न करता यासाठी सर्वसमावेशक समिती नेमणे आवश्यक आहे. या अकार्यकारी अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या जबाबदारी शिवाय वर्षानुवर्षे वेतन दिले जात आहे. आर्थिक अडचणीतील एसटीसाठी संयुक्तिक नाही. आरोपाबाबतीत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांना वेगळे काही काम देता येईल का? या संदर्भात चौकशी समिती गठित करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या परिवहन विभागाने दिलेल्या आदेशानुसार महामंडळाने चार सदस्यीय चौकशी नेमली होती. या समितीच्या आतापर्यंत फक्त दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. पण ही समिती सर्व समावेशक नसून ती अर्धवट असल्याचे स्पष्ट झाले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी हे वेगवेगळ्या विभागातील असल्याने प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप सुद्धा वेगवेगळे आहे. त्यामुळे या समितीत एसटीच्या सर्व विभागातील जानकार अधिकाऱ्यांना स्थान द्यायला हवे होते. पण शासनाकडून आदेश आले, म्हणून एसटी महामंडळाकडून घाईघाईने समिती गठित करण्यात आली.

ST तील अकार्यकारी अधिकाऱ्यांना काम देण्यात अडचणी

ही समिती सर्व समावेशक नसल्याने नेमलेल्या समितीमधील सदस्य अधिकाऱ्यांना अकार्यकारी अधिकाऱ्यांना काम देण्यासाठी अडचणी येत आहेत. परिणामी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या जबाबदारी शिवाय फुकट वेतन द्यावे लागत आहे. हे तोट्यातील एसटीसाठी योग्य नसून शासनाने पुन्हा लक्ष घालून तात्काळ या संदर्भात निर्णय घ्यावा. तसेच या समितीला काल मर्यादा घालून देण्यात यावी अशी मागणीही श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

हेही वाचा :  Kumbh Mela : नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *