FYJC admission : तिसऱ्या फेरीसाठी ५ लाख ६४ हजार विद्यार्थी पात्र

मुंबई :

अकरावी प्रवेशाची तिसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी २३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीसाठी १८ ते २० दरम्यान नव्याने अर्ज नोंदणी, अर्ज दुरुस्ती आणि पसंतीक्रम भरण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीमध्ये ६१ हजार २०७ विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरले, तर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ६४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविला आहे. त्यामुळे पसंतीक्रम न भरलेले २ लाख ३८ हजार ३३० विद्यार्थी हे तिसऱ्या फेरीसाठी अपात्र ठरणार आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रिया voice of eastern
अकरावी प्रवेश प्रक्रिया

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी नव्याने अर्ज नोंदणी, अर्ज दुरुस्ती आणि पसंतीक्रम भरण्यासाठी १८ ते २० जूनचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीमध्ये राज्यभरातून ६१ हजार २०७ विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरले. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख ३७ हजार ६५६ इतकी झाली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी शून्य फेरीसह पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ६ लाख ३५ हजार २६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर अद्यापही ८ लाख २ हजार ६३० विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तिसऱ्या फेरीसाठी अर्ज निश्चित करण्याच्या दिलेल्या संधीमध्ये नियमित व कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी ५ लाख ६४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविला आहे. यामध्ये नियमित फेरीअंतर्गत ४ लाख ९५ हजार ७०७ तर कोट्यांतर्गत ६८ हजार ५९३ विद्यार्थ्यानी पसंतीक्रम नोंदवून अर्ज निश्चित केला आहे. तिसऱ्या फेरीसाठी २ लाख ३८ हजार ३३० विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.

FYJC admission : तिसऱ्या फेरीसाठी मुंबईतून सर्वाधिक अर्ज निश्चित

तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतून सर्वाधिक १ लाख ४७ हजार ३४० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. यामध्ये नियमित फेरीअंतर्गत १ लाख २३ हजार ८८६ तर कोट्यांतर्गत २३ हजार ४५४ विद्यार्थ्यानी अर्ज निश्चित केला आहे. त्याखालोखाल पुण्यामधून ९८ हजार ५६१, नाशिकमधून ६६ हजार ५४, छत्रपती संभाजी नगरमधून ६५ हजार १४५, कोल्हापूर ५७ हजार ४६०, अमरावतीमधून ४९ हजार ५, नागपूरमधून ४६ हजार २९६ आणि लातूरमधून ३४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत.

FYJC admission : तिसऱ्या फेरीसाठीची २३ जून रोजी गुणवत्ता यादी

तिसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी २३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. या फेरीमध्ये महाविद्यालय वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना २३ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

हेही वाचा :  HBOT : सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत