Kumbh Mela : नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई –

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य मंत्रालयातील समिती कक्षात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नाशिक परिमंडळातील आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सिंहस्थ पर्वणी काळात गर्दीमुळे संपर्क यंत्रणेत अडचणी निर्माण होऊ नसे यासाठी आरोग्य विभागाने रुग्णसेवेसाठी वॉकी-टॉकीचा वापर करणे, त्याबाबतची माहिती अद्यावत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण प्रणाली उभारण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिले.

Kumbh Mela : १३ घाटावर १२ कोटी भाविक येणार

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, यंदा सिंहस्थ पर्वणी निमित्त नाशिक मधील १३ घाटावर अंदाजे १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी, कुंभमेळा प्राधिकरण आणि विविध विभागांच्या समन्वयातून त्र्यंबक, रामकुंड, सीता गुंफा, साधू धाम, मुक्ती धाम व इतर धार्मिक स्थळावर आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. लवकरच स्वतः नाशिक येथे भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Kumbh mela voice of eastern
कुंभमेळा

सिंहस्थ पर्वणी काळात गर्दीमुळे संपर्क यंत्रणेत अडचणी निर्माण होऊ नसे यासाठी आरोग्य विभागाने रुग्णसेवेसाठी वॉकी-टॉकीचा वापर करणे, त्याबाबतची माहिती अद्यावत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण प्रणाली उभारण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिले.

देशभरातून येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. आरोग्य सेवा व्यवस्थापनासाठी विविध स्तरांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक तयारी करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

धार्मिक स्थळावरील स्वच्छतेवर विशेष भर

कुंभमेळ्याच्या दरम्यान रोगराईचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक, त्र्यंबक, रामकुंड, सीतामंडी व इतर सर्व धार्मिक स्थळावरील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा. पाण्याच्या स्रोतांची तपासणी करावी. ‘आरोग्य रक्षक किट’ व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. आरोग्य सेवा व्यवस्थापनासाठी विविध स्तरांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक तयारी करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

हेही वाचा : मुंबईतील जर्जर LIC इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *