ST promotion : पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ

मुंबई :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील लिपिक-टंकलेखक पदांच्या खात्यांतर्गत पदोन्नती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाली असून कर्मचाऱ्यांच्या भवितव्याची खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी महामंडळातील चालक, वाहक, शिपाई, सहाय्यक आदी तत्सम पदातील कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के पदांवरील पदोन्नती प्रक्रियेत काही विभागांत भ्रष्टाचाराच्या हेतूने गेली तीन , चार वर्षे प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी ज्येष्ठता डावलून, तर काही ठिकाणी नावातील बदलाचे कारण देत नियमबाह्य पद्धतीने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पात्र ठरविण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

ST promotion : अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – श्रीरंग बरगे

बरगे यांच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविन्यात आली पाहिजे, कारण प्रत्येक वर्षी रिक्त होणाऱ्या सरळ सेवा भरतीमधून २५ टक्के पदे सेवेतील कर्मचाऱ्यामधून भरण्याचे परिपत्रक असून गेली दोन, तीन वर्षे ही प्रक्रिया रखडल्याने अनेक कर्मचारी या पदोन्नती पासून वंचित राहिले आहेत. अशाच गंभीर प्रकरणी एका विभागातील खात्यांतर्गत चौकशीत समितीतील तीन अधिकाऱ्यांवर समान स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी दोघांना दोषी ठरविण्यात आले, तर एका अधिकाऱ्याला निर्दोष ठरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करून कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही बरगे यांनी केली.

हेही वाचा : B.Pharm. admission : २०२५-२६ पूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत