RakshaBandhan : मुंबईतील कामा रुग्णालयात रक्षाबंधन उत्साहात

मुंबई : 

मुंबईतील कामा आणि अल्ब्लेस रुग्णालयात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी कर्तव्यावर असलेल्या परिचारिका आणि महिला सुरक्षा रक्षकांना राख्या भेट देऊन हा सण साजरा केला. राख्या भेट देऊन डॉ. तुषार पालवे यांनी परिचारिका आणि महिला सुरक्षा रक्षक यांच्या समर्पण व सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कामा रुग्णालय रक्षाबंधन  voice of eastern
कामा रुग्णालय रक्षाबंधन

याप्रसंगी डॉ. पालवे म्हणाले, आमच्या परिचारिका आणि महिला सुरक्षा रक्षक या रुग्णालयाच्या खऱ्या रक्षक आहेत. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी त्या अहोरात्र काम करतात. रक्षाबंधनानिमित्त आम्ही त्यांच्या निष्ठेला सलाम करतो आणि त्यांना आमच्या पूर्ण पाठिंब्याची व आदराची ग्वाही देतो. कर्मचाऱ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला.

RakshaBandhan : आमच्या कार्याचा गौरव केल्याची भावना

वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी परिचारिका आणि महिला सुरक्षा रक्षकांना दिलेल्या राख्यांमुळे आमच्या कार्याचा एक प्रकारे गौरव केला. तसेच यामुळे आमचे मनोबल उंचावण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Jogeshwari Trauma: न्यूरोसर्जरीच्या रुग्णांवर अद्ययावत उपचार

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत