Law Admission: विधिच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

विधि महाविद्यालयाच्या यादीत १३० महाविद्यालयाची भर व ७६२० नवीन जागा उपलब्ध

मुंबई :

भारतीय विधिज्ञ परिषदेची (बार काैन्सिल ऑफ इंडिया) मान्यता नसल्याने प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या काही महाविद्यालयांना मान्यता मिळत आहे. या महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश करावा लागत असल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून ३ व ५ वर्ष विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ३ वर्षीय विधि प्रवेशाचे जागावाटप १४ ऑगस्ट तर ५ वर्षीय विधिचे जागावाटप १७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

law
law

विधि तीन व पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस ५ ऑगस्टपासून सुरुवात झाली. मात्र बार काैन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेअभावी ३ वर्ष अभ्यासक्रमासाठी फक्त ९३ महाविद्यालयांमधील १० हजार १०५ जागा उपलब्ध होत्या. मात्र मागील सहा दिवसांमध्ये यामध्ये आणखी ७० महाविद्यालयांची भर पडली आहे. त्यामुळे महाविद्यालयांची संख्या १६३ इतकी झाली असून, ४ हजार ७१० जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या १४ हजार ८१५ इतकी झाली आहे. तसेच ५ ऑगस्ट रोजी ५ वर्षीय विधि अभ्यासक्रमाचे ५६ महाविद्यालये व ५ हजार ९५५ जागा उपलब्ध होत्या. त्यामध्ये आता ६० महाविद्यालये वाढल्याने महाविद्यालयांची संख्या ११६ झाली आहे. तसेच २ हजार ९१० जागा उपलब्ध झाल्याने उपलब्ध जागांची संख्या ८ हजार ८६५ इतकी झाली आहे. ३ व ५ वर्ष या दोन्ही विधि अभ्यासक्रमासाठी राज्यभरात २७९ महाविद्यालये प्रवेशासाठी उपलब्ध असून २३ हजार ६८० जागा उपलब्ध आहेत. यापुढे मान्यता मिळाल्यानंतर समाविष्ट होणाऱ्या महाविद्यालयांचा समावेश पुढील फेरीत करण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Law Admission: दोन्ही अभ्यासक्रामसाठी ३३ हजार विद्यार्थ्यांनी भरले प्राधान्यक्रम

३ व ५ वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ ऑगस्ट रोजी प्राधान्यक्रम भरण्यास मुदत दिली होती. त्यानुसार या दोन्ही अभ्यासक्रमासाठी ११ ऑगस्टपर्यंत ३३ हजार २०३ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले आहेत. यामध्ये ३ वर्षीय विधिच्या २३ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी तर ५ वर्षीय विधीच्या ९ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले आहेत.

Law Admission: सुधारित वेळापत्रक

प्रवेश प्रक्रियेतील बाब —————————— ३ वर्षीय विधि ———- ५ वर्षीय विधि

  • प्रथम फेरीची जागावाटप यादी जाहीर करणे ———- १४ ऑगस्ट———– १७ ऑगस्ट
  • जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे———– १७ ते २० ऑगस्ट ———- १८ ते २१ ऑगस्ट
  • दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे ———– २१ ऑगस्ट ———- २२ ऑगस्ट
  • दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालय प्राधान्यक्रम भरणे ———– २२ ते २४ ऑगस्ट ———- २३ ते २६ ऑगस्ट
  • दुसऱ्या फेरीची जागावाटप यादी जाहीर करणे ———– २७ ऑगस्ट ———-२८ ऑगस्ट
  • जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे ———– २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर ———- २९
  • ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरी फेरी व संस्थास्तरीय फेरीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी पर्याय ———– ५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर ———-५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर
  • तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे ———– ३ सप्टेंबर———– ३ सप्टेंबर
  • तिसऱ्या फेरीची जागावाटप यादी जाहीर करणे ———– १७ सप्टेंबर ———-१८ सप्टेंबर
  • जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे ———– १८ ते २१ सप्टेंबर ———-१९ ते २३ सप्टेंबर

हेही वाचा : Drug-free Mumbai : गणेश मंडळांनी समाजप्रबोधनावर भर द्यावा : लोढा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत