UPSC : लोकसेवा आयोगाच्या यशवतांचा एकनाथ शिंदेंच्या हस्ते गौरव

मुंबईत रंगणार विशेष सोहळा

मुंबई :

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा शनिवारी, १ ऑगस्ट रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीए क्रिकेट क्लब रिक्रिएशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याहस्ते हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला असून शिवसेना पक्षाचे सचिव आणि तेजपर्व संघटनेचे अध्यक्ष सुधाकर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्या तआले आहे. यशस्वी उमेदवारांचा गौरव करण्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सुधाकर शंकर तांबोळी voice of eastern
सुधाकर तांबोळी

मुंबईतील वांद्रे येथील एमसीए क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे. सत्कार सोहळ्यात ‘शब्दगंध’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर आणि गुलजार यांच्या लोकप्रिय गीतांचे स्वराभिवाचन या कार्यक्रमात होईल. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

UPSC : तेजपर्व सामाजिक संस्थेकडून आयोजन

तेजपर्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, शिवसेना सचिव तथा तेजपर्व सामाजिक संस्था – अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य सुधाकर शंकर तांबोळी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील युपीएससी UPSC आणि एमपीएससी MPSC परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.\

हेही वाचा : Robotic telesurgery : २२ हजार किमी अंतरावरून जगातील पहिली रोबोटिक टेलीसर्जरी

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत