organ donation : ट्रेझर हंट आणि कार डेकोरेशन स्पर्धेतून दिला संदेश
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) – एनईबीएस आणि झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचा पुढाकार
मुंबई :
अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) – एनईबीएस आणि झायनोवा शाल्बी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घाटकोपर येथे भव्य जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत सहभागी नागरिकांनी अवयवदानाचे महत्त्व सांगणारे फलक हातात घेत जनजागृती केली. याशिवाय ट्रेझर हंट आणि कार डेकोरेशन अशा विविध जनजागृतीपर स्पर्धांचे आयोजन करच अवयवदानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
यावेळी आयएमए-एनईबीएसचे अध्यक्ष डॉ. कल्पेश शाह, सचिव डॉ. उर्वी महेश्वरी, खजिनदार डॉ. नेहा शाह, आयएमएचे इतर सदस्य तसेच झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेनी वर्गीस उपस्थित होते.
organ donation : हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत
भारतामध्ये दरवर्षी हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असतात. मात्र, अवयवदात्यांची संख्या अत्यल्प असल्याने अनेकांना वेळेत अवयव उपलब्घ होत नाहीत. अवयवदानाविषयी जागरूकता वाढविणे आणि नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
आयएमए-एनईबीएसचे अध्यक्ष डॉ. कल्पेश शाह म्हणाले, अवयवदान ही केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक स्तरावर याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. झायनोवा शाल्बी हॉस्पिटलने याबाबत पुढाकार घेतला असून ही एक कौतुकास्पद बाप आहे. अशा उपक्रमांमुळे जनजागृती वाढते व नागरिकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित मिळते. यामध्ये ब्रेन डेड व्यक्तीची त्वचा, डोळे, यकृत, मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुसे आणि स्वादुपिंड यांसारख्या अवयवांचे दान करता येते. देशात अवयवांची गरज मोठ्या प्रमाणात असून त्यामानाने अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प आहे.
organ donation : एका व्यक्तीमुळे अनेकांना नवे आयुष्य मिळू शकते
झायनोवा शाल्ही रूग्णालयातील सीओओ रेनी वर्गीस म्हणाले की, अवयवदानाने एका व्यक्तीमुळे अनेकांना नवे आयुष्य मिळू शकते. दुर्दैवाने जागरूकतेचा अभाव आणि नोंदणी कमी झाल्यामुळे अनेक रुग्णांना अवयव प्राप्त होण्याकरिता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. जनजागृती ही अवयवदानाचे प्रमाण वाढविण्याची पहिली पायरी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजातील गैरसमज दूर करून कुटुंबांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येक अवयवदाता अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरू शकतो.
हेही वाचा : WorldSkills Competition: भारतीय वंशाच्या प्रथम लोहियाची निवड
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १७ वर्षीय अरिंदम जोशी सांगतो की, या उपक्रमामुळे अवयवदान हे केवळ वैद्यकीय गरज नसून ती कित्येक कुटुंबांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे याची मला जाणी झाली. या उपक्रमाने मला अवयवदानाची शपथ घेण्याची प्रेरणा दिली असून मी माझ्या कुटुंबीय आणि मित्रांनाही याबाबत जागरूक करणार आहे.



